म्हणता म्हणता गणपती बाप्पाच्या येण्याचा दिवस अगदी उंबऱ्याशी येऊन ठेपला आहे. कितीही केली तरी या तयारीत कमतरता जाणवत राहते. विशेषत: गणपती डेकोरेशनमध्ये दरवर्षी नवे आणि आकर्षक डेकोरेशन कसे करावे हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. विशेष म्हणजे बाजारात सजावटीचे इतके साहित्य उपलब्ध असताना कोणते निवडावे आणि ते योग्यप्रकारे कसे वापरावे याच्या काही सोप्या आयडिया आम्ही तुम्हाला देत आहोत.
आयडिया नं 1:
चहा प्यायचे कागदी कप, कार्डबोर्ड, रंगीत पेपर आणि हॉट ग्लू गनच्या सहायाने केलेले हे अगदी सोपे आणि सुंदर डेकोरेशन. यात आणखी काही करायचे असल्यास कपांच्या काठांना आणखी सजवू शकता.
डेकोरेशन स्टँडवर तुम्ही भरजरी ओढणी वापरुन कमाल डेकोरेशन करू शकता . यासोबत बाजारात मिळणाऱ्या फुलांच्या माळा दोन्ही बाजूने सोडल्यास किंवा स्टँडच्या कडेला पानांसाहित गुंडाळल्यास या लूकला चार चाँद लागू शकतात.
घरातील दोन किंवा तीन ओढण्यावापरुन तुम्ही बॅकड्रॉप करू शकता. एकापेक्षा जास्त ओढण्या वापरणार असाल तर कलर कॉम्बिनेशन आकर्षक निवडा. जर ओढण्याचे रंग जास्त निवडत असाल तर हाराचे रंग शक्यतो एकाच असावा.
ओरिगामीची आवड असेल तर पुढचा व्हीडियोतील सजावट तुम्ही नक्कीच करू शकता. मोराच्या पंखाच्या रंगाचे त्या त्या आकारात कापलेले कागद एकत्र जोडून सुंदर आणि हटके डेकोरेशन करता येऊ शकेल
बॅकड्रॉप म्हणून डार्क साडी असेल तर फिकट फुले यांच्या कॉम्बिनेशनने केलेले डेकोरेशन सुबक दिसते