पापलेट, हळद, मीठ, केळीचं पान, मोहरीचं आणि नेहमीच्या वापरातलं तेल, वाटणासाठी - आलं, लसूण, मिरच्या, पुदिना, कोथिंबीर, काळी मिरी, लिंबू.
पापलेट साफ करून त्याला एकेका इंचावर चीर द्या. माशाला मीठ आणि हळद व्यवस्थित लावून घ्या. एकीकडे आलं, लसूण, पुदिना, कोथिंबीर, मिरची, मिरी आणि लिंबाचा रस एकत्र करून बारीक वाटून घ्या. हे वाटण माशाला तर लावाच; पण माशाच्या चिरांमध्येही नीट भरून घ्या. आता केळीचं पान तव्यावर ठेवा आणि रंग बदलेपर्यंत भाजून घ्या. या पानात वाटण लावलेला मासा गुंडाळून पानाच्या सगळ्या खुल्या बाजू टूथपिक लावून बंद करा किंवा दोर्याने बांधा. साधारणत: अर्ध्या तासाने हा पानात बांधलेला मासा दोन्ही बाजूंनी मध्यम आचेवर भाजून घ्या. चमचमीत पापलेट तय्यार.