सोप्या पद्धतीने अंडा मसाला कसा बनवाल? (फोटो - प्रातिनिधिक) Photo by Pranjall Kumar: https://www.pexels.com/photo/green-masala-egg-curry-dish-in-bowl-8625813/
मेजवानी

Egg Masala Recipe : सोप्प्या पद्धतीने बनवा झणझणीत अंडा मसाला

सोप्प्या पद्धतीने बनवा झणझणीत अंडा मसाला

पुढारी वृत्तसेवा

Egg Masala Recipe साहित्य

अर्धा डझन अंडी, सिमला मिरची, कांदा, टोमॅटो, कोबी, कढीपत्ता, हिंग, हळद, गरम मसाला, तेल, हिरव्या मिरच्या, तिखट, आलं लसूण पेस्ट, मीठ.

Egg Masala Recipe ची कृती

लांबट चिरलेली मिरची, कढीपत्त्याची तेलात खमंग फोडणी करा. त्यात बारीक चिरलेला कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या. त्यातच बारीक चिरलेला टोमॅटो घालून मिश्रण नीट शिजवून घ्या. हळद, तिखट, हिंग, आलं-लसूण पेस्ट, गरम मसाला, बारीक चिरलेली सिमला मिरची व कोबी घालून पुन्हा परता.

मसाला सरसरीत हवा असल्यास थोडं पाणी घाला. आता मीठ घालून एक उकळी येऊ द्या. अर्धा डझन अंडी उकडून, गार करून, सोलून घ्या आणि त्यांना सुरीने व्यवस्थित चीर मारून ठेवा म्हणजे मसाला त्यात छान मुरेल. मसाल्याला उकळी येऊन तो नीट शिजल्याची खात्री केल्यावर त्यात अंडी सोडा, परतून घ्या, छान वाफ काढा आणि गरमागरम खायला घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT