New Innovation Electricity Through Air: फिनलँडमधील शास्त्रज्ञांनी विजेच्या तारांशिवाय इलेक्ट्रिसिटी ट्रान्समीट करून क्रांती घडवली आहे. शास्त्रज्ञांनी हाय इंटेन्सिटी साऊंड वेव्ह आणि लेसर यांचा एकत्रित वापर करून इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिट करण्याचा प्रयोग केला. शोधकर्त्यांना प्लग, वायर आणि विजेची पारंपरिक कनेक्शनशिवाय वीज पुरवठा करायचा होता. त्यांच्या या नव्या यशामुळं घराघरात पोहचणारी वीज, फॅक्ट्री आणि उपकरणांचा चेहरा मोहराच बदलणार आहे.
फिनलँडमधील शास्त्रज्ञांनी हवेतून इलेक्ट्रिसिटी ट्रान्समीट करण्याचा यशस्वी प्रयोग केला. यासाठी त्यांनी अल्ट्रासोनिक साऊंड वेव्ह, लेसर आणि रेडिओ फ्रिक्वेन्सीचा वापर केला. या प्रयोगाला यश आलं आहे आहे. त्यामुळे आचा प्लग, केबल वायर याच्याशिवायही इलेक्ट्रिसिटी घराघरात पोहचवणं शक्य आहे हे सिद्ध झालं आहे.
हेलेन्स्की विद्यापीठ आणि ओऊलू विद्यापीठ यांच्या टीमनं हा प्रयोग केला. यासाठी त्यांनी पॉवर बाय लाईट आणि रेडिओ फ्रिक्वेन्सीबाबत काम करणाऱ्या खासगी कंपनींचे देखील सहकार्य घेतलं. प्रॅक्टिकल निष्कर्षासाठी या प्रोजेक्टमध्ये फिजिक्स, इंजिनिअरिंग आणि कटिंग एज इनोव्हेशनचा वापर करण्यात आला. आता हवेतून वीज वाहून नेण्याचा प्रयोग करणारा फिनलँड हा जगातील सर्वात पहिला देश ठरला आहे.
ऑकोस्टिक वायर हे हाय इंटेन्सिटी अल्ट्रासोनिक साऊंड वेव्हचा वापर करून विजेच्या प्रवाहाला दिशा देते. ते हवेत एक अदृष्य वीज वाहून नेण्याचा मार्ग तयार करते. हे लाटेसारखंच काम करतं. इलेक्ट्रिक स्पार्क या अल्ट्रासोनिक मार्गाने सुरक्षितरित्या कोणत्याही स्पर्शाशिवाय ट्रॅव्हल करतात. यामुळे विजेची उपकरणे आणि स्मार्ट उपकरणांना कॉन्टॅक्टलेस पॉवर डिलिव्हरी शक्य होतं.
जरी या पद्धतीनं हवेतून इलेक्ट्रिसिटी वाहून नेता येत असली तरी हे तंत्रज्ञान वायरलेस म्हणता येणार नाही. फिनलँडच्या संशोधकांनी टीमनं फिल्ड गायडेड एनर्जी निर्माण केली आहे. ही एनर्जी फ्री प्लोटिंग पॉवर नाहीये. अल्ट्रासोनिक वेव्ह हे छोट्या स्पार्क्सना एका विशिष्ठ मार्गातून पुढे ट्रान्समीट करतात. लेसर लाईटचे रूपांतर अगदी छोट्या इलेक्ट्रिसिटीमध्ये अत्यंत सुरक्षित पद्धतीनं डिलिव्हर करतं. रेडिओ फ्रिक्वेन्सी आजूबाजूला अस्तित्वात असलेले मायक्रोवॅट कलेक्ट करतं.
संशोधकांनी विशिष्ट अशी अल्ट्रासोनिक बीम आणि लेसर सिस्टम तयार केली ज्यातून इलेक्ट्रिसिटीला दिशा देता येईल. त्यानंतर लेसरद्वारे ही उर्जा दूरवरच्या रिसिव्हरपर्यंत ट्रान्समिट केली. यावेळी गॅल्वेनिक आयसोलेशनचा देखील वापर करण्यात आला. त्यानंतर रेडिओ फ्रिक्वेन्सीचा वापर करून अॅम्बियन्ट वेव्हचे रूपांतर इलेक्ट्रिस्टीमध्ये करण्यात आलं. या सर्व पद्धतींचा वापर करून इलेक्ट्रिसिटी ही सुरक्षितरित्या आणि प्रभावीपणे हवेतून ट्रान्समीट करता येते हे दिसून आले.
जगात वायरलेस चार्जिंग फोन आणि छोटे डिवाईस अस्तित्वात आहेत. मात्र फिनलँड पहिला देश आहे ज्याने खरी इलेक्ट्रिसिटी हवेतून सुरक्षितरित्या ट्रान्समीट करून दाखवली आहे. यासाठी त्यांनी मोठ्या स्तरावर केलेला साऊंड, लाईट आणि रेडिओचा उपयोग हा पारंपरिक गोष्टींना छेद देणारा ठरला आहे. इतर देशांनी छोट्या प्रमाणावर अशा प्रकारचा प्रयोग केला आहे. मात्र फिनलँडने याचे मोठ्या प्रमाणावर प्रॅक्टिकल करून देखवत आघाडी घेतली आहे.
या नव्या प्रयोगामुळे पारंपरिकरित्या वीज वाहून नेण्यासाठी वायरची गरज लागते यालाच छेद गेला आहे. या प्रयोगामुळे कल्पकता, अचुकता आणि नाविण्यपूर्ण भौतिकशास्त्र जुन्या समस्याही सोडवू शकते हे दिसून आले. यामुळे आता घराघरात, कारखाना आणि उद्योगधंद्यांना केबल फ्री इलेक्ट्रिसिटी पुरवण्यासाठीची दारे उघडली गेली आहेत.