महाराष्ट्र खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) अधिनियम २०१५ अन्वये राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष व प्रवेश नियामक प्राधिकरण यांची स्थापना करण्यात आली. उक्त अधिनियमाच्या तरतुदीनुसार राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून तंत्रशिक्षण, उच्च शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, आयुष शिक्षण, कृषी शिक्षण व कला शिक्षण या सहा विभागांतर्गत एकूण १७ विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी २० ऑनलाईन सामाईक प्रवेश परीक्षा व ४३ अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येतात. हे प्रवेश ५७०० पेक्षा जास्त शैक्षणिक संस्थांमधून दिले जातात. तसेच प्रवेश नियामक प्राधिकरणकडून प्रवेश मान्यतेची प्रक्रिया राबविण्यात येते. २०१६-२७ मध्ये देशभरातून १ लाख २९ हजार ४८४ विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षा दिली आहे. या सीईटी कक्षाला यावर्षी यशस्वीरीत्या १० वर्षे पूर्ण झाली आहेत.
१. तंत्रशिक्षण विभाग
पदवी अभ्यासक्रम: पदवी अभियांत्रिकी (BE/B.Tech.), पदवी औषधनिर्माण (B. Pharmacy), पदवी वास्तुशास्त्र शास्त्र (B. Architecture), बीबीए / बीएमएस / बीबीएम / बी. एचएमसीटी (BBA / BCA / BMS / BBM / B. HMCT), थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी (Direct Second Year Engineering), थेट द्वितीय वर्ष औषधनिर्माण (Direct Second Year Pharmacy), बी.डिझाईन (B. Design), पदवी योजना (B. Planning), बी.ई.एकात्मिक (BCA + MCA Integrated), बीबीएम + एमबीए (एकात्मिक) (BBM + MBA Integrated).
पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम: पदव्युत्तर मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन / मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (MBA / MMS), पदव्युत्तर मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (MCA), पदव्युत्तर अभियांत्रिकी (ME/M.Tech.), पदव्युत्तर औषधनिर्माण (M.Pharmacy), पदव्युत्तर वास्तुशास्त्र शाखा (M. Architecture), पदव्युत्तर हॉटेल मॅनेजमेंट व कॅटरिंग टेक्नॉलॉजी (MHMCT).
कार्यरत विद्यार्थ्यांसाठी समांतर प्रवेश
२. उच्च शिक्षण विभाग
पदवी अभ्यासक्रम: पदवी शिक्षणशास्त्र (सामान्य व विशेष) (B.Ed. - General & Special), पदवी शारीरिक शिक्षण (B.P.Ed), पदवी विधी ३ वर्ष (LLB 3 Years), पदवी विधी ५ वर्ष (एकात्मिक) (LLB 5 Years Integrated)
पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम: पदव्युत्तर शिक्षणशास्त्र (M.Ed.), पदव्युत्तर शारीरिक शिक्षण (M.P. Ed.), पदवी शिक्षण-पदव्युत्तर शिक्षण (एकात्मिक) (B.Ed-M.Ed Integrated).
३. वैद्यकीय व आयुष शिक्षण विभाग
खालील नमूद अभ्यासक्रमाचे प्रवेश परीक्षा राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या नीट युजी (NEET UG) व एआयएपीजीईटी (AIAPGET), राष्ट्रीय परीक्षा मंडळाद्वारे (NBE) घेण्यात येणारी नीट पीजी (NEET PG), नीट एमडीएस (NEET MDS) व राज्य सीईटीद्वारे घेण्यात येणाऱ्या नर्सिंग सीईटी (Nursing CET), डीपीएन / पीएचएन सीईटी (DPN/PHN CET) व पीजीपी/पीजीओ/एम.एस्सी-एएसएलपी अँड ए / एम.एस्सी पी अँड ओ (PGP/PGO/M.Sc-SLP & A / M.Sc P & O) या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा घेण्यात येतात.
पदवी अभ्यासक्रम: एमबीबीएस (MBBS), बीडीएस (BDS), बीएमएस (BAMS), बीएचएमएस (BHMS), बीयुएमएस (BUMS), बीपीटीएच (BPTH), बीओटीएच (BOTH), बीएसएलपी (BASLP), बीपी अँड ओ (BP&O), बीएससी नर्सिंग (B.Sc Nursing), बीएनवायएस (BNYS), जनरल नर्सिंग व मिडवायफरी (GNM)
पदविका अभ्यासक्रम: डिप्लोमा इन सायकेट्रीक नर्सिंग (DPN), डिप्लोमा इन पब्लिक हेल्थ नर्सिंग (PHN)
पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम: पीजी मेडिकल (PG Medical MD/MS), पीजी डेंटल (PG Dental MD/MS), पीजी आयुर्वेद (PG Ayurveda MD/MS), पीजी होमिओपॅथी (PG Homeopathy MD), पीजी युनानी (PG Unani MD/MS), पीजी फिजिओथेरपी / ऑक्युपेशनल थेरपी (PG Physiotherapy / PG Occupational therapy)
४. कृषी शिक्षण विभाग
पदवी अभ्यासक्रम: बीएससी (ऑनर्स) कृषी (B.Sc. (Hons) Agriculture), बीएससी (ऑनर्स) उद्यानविद्या (B.Sc. (Hons) Horticulture), बी.एस्सी. (ऑनर्स) वनविद्या (B.Sc. (Hons) Forestry), बी. एफ. एस्सी मत्स्यविज्ञान (B.F. Sc. Fishery Science), बी. टेक. कृषी अभियांत्रिकी (B.Tech. Agriculture Engineering), बी. टेक.अन्न तंत्रज्ञान (B.Tech. Food Technology), बीएससी (ऑनर्स) सामुदायिक विज्ञान (B.Sc. (Hons) Community Science), बी. टेक. जैवतंत्रज्ञान (B.Tech. Biotechnology), बीएससी (ऑनर्स) कृषी व्यवस्थापन (B.Sc. (Hons) Agri-Business Management)
५. कला शिक्षण विभाग
पदवी अभ्यासक्रम: पदवी रेखा व शकला (BFA Painting), पदवी शिल्पकला व प्रतिमानबंध (BFA Sculpture), पदवी वस्त्राकला (BFA Textile Design), पदवी मृत्काम (BFA Ceramics), पदवी अंतर्गत गृहसजावट (BFA Interior Decoration), पदवी धातुकाम (BFA Metal Work), पदवी उपयोजित कला (BFA Applied Art)
सीईटी कक्षाची वैशिष्ट्ये
प्रथमच वर्षापासून पीसीएम, पीसीबी व एमबीए-एमएमएस या तीन अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षेच्या दोन संधी उपलब्ध.
प्रथम वर्षापासून पीसीएम व पीसीबी समूहाची सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना बीबीए, बीएमएस, बीबीएम, बीसीए व बीएचएमसीटी या अभ्यासक्रमाला प्रवेशाची संधी
ऑनलाईन पद्धतीने नोंदणी सुविधा
प्रवेश प्रक्रिया पारदर्शक व केंद्रीय प्रवेश पद्धतीने
विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यास्तरीय ४० विद्यार्थी सहाय्यता केंद्रे
विद्यार्थी केंद्रित धोरण
विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये सर्व सुविधा उपलब्ध
विद्यार्थ्यांसाठी तक्रार निवारण समिती
ऑनलाईन हेल्पलाईन व दूरध्वनी हेल्पलाईन सेवा उपलब्ध
परीक्षोत्तर ऑब्जेक्शन टँकर सुविधा उपलब्ध