Engineering Education
अभियांत्रिकी शिक्षणात आता कौशल्य विकासाला बळ Pudhari File Photo
एज्युदिशा

Engineering Education| अभियांत्रिकी शिक्षणात आता कौशल्य विकासाला बळ

पुढारी वृत्तसेवा

औद्योगिक क्रांतीने जगाला अनेक नवनव्या तंत्रज्ञानाची ओळख करून दिली, ज्या तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीसाठी होतकरू अभियंत्यांनी स्वतःला अद्ययावत करणे आवश्यक आहे. मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स हे अभियांत्रिकीमधील काही नवीन ट्रेंड आहेत जे भारताच्या भविष्याला आकार देण्यासाठी खऱ्या अर्थान निर्णायक ठरणार आहेत.

यामुळे आता अभियांत्रिकी शिक्षणात कौशल्य विकासाला पाठबळ मिळत असून हे कौशल्य आत्मसात करण्याची नवी संधी विद्यार्थ्यांना आहे, असे शाह आणि अँकर कच्छी अभियांत्रिकी महाविद्यालय (एसएकेईसी) प्राचार्य डॉ. 'भावेश पटेल यांनी दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

अभियांत्रिकी क्षेत्रातील हे नवे तंत्रज्ञान हे कल्पनेतील जगाला वास्तविक जगातील अनुभवात रूपांतरित करण्याची क्षमता देते. नव्या तंत्रज्ञानाला जगभरात सर्वाधिक रोजगाराच्या संधी आणि सर्वाधिक मोबदला आहे. शाह आणि अँकर कच्छी अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून प्रवेश घेत असलेल्या प्रत्येकाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी प्रगत आणि अत्याधुनिक अभियांत्रिकी अभ्यासक्रम देण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे.

अभियांत्रिकी क्षेत्रासाठी देशाला मोठ्या क्षमतेची गरज आहे. भारतातील उत्पादन आणि अभियांत्रिकी क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले आहे ज्यात अभियांत्रिकी महाविद्यालये अद्ययावत करणे, प्राध्यापकांची गुणवत्ता सुधारणे आणि विद्यार्थ्यांसाठी चांगल्या पायाभूत सुविधा प्रदान करणे याला नेहमीच प्रोत्साहन दिले आहे.

म्हणूनच अभियांत्रिकी क्षेत्र हे सरकारच्या मेक इन इंडिया मिशनला विशेष संलग्न आहे. याच धर्तीवर नव्या युगाच्या आशा-आकांक्षा आणि मागण्या पूर्ण करण्यासाठी आमच्या महाविद्यालयाने प्रयोगशाळा, संशोधन केंद्रे, कॅम्पस संस्कृती आणि शिक्षण सुविधा अधिक अद्ययावत आणि सक्षम करण्यास सुरुवात केली आहे.

विशेषतः ऑटोमेशनमध्ये झालेल्या प्रचंड प्रगतीने मंदीला मोठा हातभार लावला आहे. यामुळे अभ्यासक्रमाचे पुनर्मूल्यांकन करण्याकडे महाविद्यालयाचे ध्येय आहे. उद्योगाच्या गरजा आणि शैक्षणिक अभ्यासक्रम यांच्यातील विसंगती दूर करणे, नवनवे तंत्रज्ञान आणि सध्याच्या बाजारपेठेच्या मागणीशी जुळणारे सॉफ्ट स्किल्स समाविष्ट करून घेण्यासाठी संस्थांनी त्यांच्या अभ्यासक्रमाचे पुनर्मूल्यांकन आणि अद्ययावतीकरण करून नवीन अभ्यासक्रमाला चालना दिली आहे.. प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या पुढील करियरच्या दृष्टीने प्रत्यक्ष प्रशिक्षणावर भर दिला जात असून इंटर्नशिप आणि प्रत्यक्ष प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना नोकरीसाठी प्रशिक्षित करणे आणि संभाव्य नियोक्त्यांकरिता विद्यार्थ्यांना अधिक सक्षम बनवण्यासाठी नेहमीच महाविद्यालयाचा पुढाकार असणार आहे. उद्योजकतेवर विशेष लक्ष दिले जात आहे.

कारण नोकरीच्या संधी कमी होत असल्याने, विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय कौशल्ये वाढवण्याची गरज वाढत आहे. यामध्ये त्यांना बाजारातील गरजा ओळखणे आणि व्यवहार्य व्यवसाय प्रारूप विकसित करणे तसे प्रशिक्षण देणे यातही आम्ही पुढाकार घेतला आहे.

आधुनिक शैक्षणिक परिसराला महत्त्व विद्यार्थ्यांना तांत्रिक कौशल्याबरोबरच व्यवसाय, डिझाइन किंवा सामाजिक विज्ञान यासारख्या इतर क्षेत्रातील ज्ञान एकत्रितपणे अर्जित करण्यासाठी आंतरविद्याशाखीय शिक्षणास प्रोत्साहन देणे, नवीन युगातील तंत्रज्ञान आणि सॉफ्ट स्किल्सवर आधारित कौशल्य विकासासाठी समर्पित केंद्रे स्थापन करणे, माजी विद्यार्थ्यांचे सशक्त नेटवर्कः मेंटॉरशिप प्रोग्रॅम्स, नेटवर्किंगच्या संधी आणि उद्योगासाठी सेतू म्हणून माजी विद्यार्थ्यांचा कल्पकतेने वापर जिथे विद्यार्थी वास्तव जगातील समस्यांवर काम करू शकतील आणि उपाय विकसित करू शकतील, असे संशोधन आणि नावीन्यपूर्ण वातावरण तयार करणे गरजेचे आहे.

ग्लोबल एक्सपोजरच्या माध्यमातून विचार आणि कल्पनांचे आदान-प्रदान, आंतरराष्ट्रीय परिषदा आणि परदेशी विद्यापीठांसह सहकार्याद्वारे ग्लोबल एक्स्पोजरसाठी संधी प्रदान करणे ही आजची गरज ओळखून तसे बदल केले जात आहेत, थोडक्यात, आधुनिक शैक्षणिक परिसर गतिमान शिक्षणासाठी विकसित करणे आवश्यक आहे जेथे विद्यार्थी केवळ शैक्षणिकदृष्ट्या तयार नसतील तर प्रचंड वेगाने बदलणाऱ्या नोकरीच्या बाजारपेठेत मुक्त संचार करण्यासाठी कौशल्ये आणि मानसिकतेने परिपूर्ण असतील.

नावीन्यपूर्ण अभ्यासक्रमाला प्राधान्य कसे द्याल? बदलत्या जगाशी आणि आवश्यकतांशी सुसंगत आणि अनुरूप असा शैक्षणिक अभ्यासक्रम संरेखित करणे आवश्यक आहे. यामध्ये उदयोन्मुख तंत्रज्ञान, प्रकल्प व्यवस्थापन आणि सॉफ्ट स्किल्स डेव्हलपमेंट यावरील अभ्यासक्रमांचे एकत्रिकरण करणे तसेच उद्योगांचा सहभाग वाढविणे, अतिथी व्याख्याने, इंटर्नशिप आणि अन्य सहयोगी प्रकल्पांद्वारे उद्योगाशी मजबूत संबंध निर्माण करणे या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ कामाचा प्रत्यक्ष अनुभव येतो असे नाही अभ्यासक्रमही सुसंगत राहतो.

वैयक्तिकृत करिअर समुपदेशन, रिझ्युम बिल्डींग कार्यशाळा आणि मुलाखतीची तयारी करून देणारी सत्रे देणाऱ्या करिअर सेवा विकसित आणि सक्षम करण्यावर नेहमीच भर ठेवला आहे. बाजारातील बदलांची महिती, त्यांना उद्योगाच्या नवनव्या बदलांचा अचूक अंदाज देणे विद्यार्थ्यांना केवळ आजच्या नोकऱ्यांसाठीच नाही तर उद्याच्या आव्हानांसाठी तयार करणे हा माझा नेहमी प्रयत्न असेल. पण मंदी असल्याची काय कारणे सांगता येतील ? आयटी क्षेत्रातील नोकऱ्या कमी होण्यास अनेक घटक कारणीभूत आहेत.

प्रमुख अर्थव्यवस्थांमधील आर्थिक मंदीमुळे आर्थिक नियोजनात कपात झाली आहे आणि आयटी सेवांवरील खर्च कमी झाला आहे, ज्याचा थेट परिणाम रोजगाराच्या संधी निर्माण होण्यावर झाला आहे. माहिती तंत्रज्ञान उद्योग प्रचंड वेगाने विकसित होत आहे. या तंत्रज्ञानासाठी आवश्यक असलेले कौशल्य संच अधिक वेगळे आहेत आणि सध्याच्या उपलब्ध पर्यायांमध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध नाहीत. वर्क फ्रॉम होमकडे कल वळल्याने ज्यामुळे कंपन्यांना मोठ्या भौगोलिक भूभागातून अनेकदा कमी किमतीत काम करवून घेण्यासाठी कौशल्य आणि कर्मचारी उपलब्ध होत आहेत.

SCROLL FOR NEXT