Pudhari Campus To Career Pudhari
एज्युदिशा

Pudhari Campus To Career Seminar: १२ वीनंतर करिअर व प्रवेश प्रक्रियेचे संपूर्ण मार्गदर्शन, कसे सहभागी व्हाल?

Pudhari Campus To Career Seminar 2026: सीईटी, नीट व विविध पदवी अभ्यासक्रमांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन; शिष्यवृत्ती, कर्जप्रक्रिया आणि वैयक्तिक करिअर काउन्सेलिंगची संधी

पुढारी वृत्तसेवा

Pudhari Campus To Career Seminar Initiative

कोल्हापूर: १२वी नंतर योग्य करिअरची निवड, प्रवेश परीक्षा, कॉलेजनिवड आणि प्रवेशप्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर अचूक मार्गदर्शनाची संधी आता एकाच व्यासपीठावर मिळणार आहे. उपक्रम विद्याथ्यांची मोठी गरज ओळखून पुढारी माध्यम समूहातर्फे 'पुढारी कॅम्पस टू करिअर' हा विशेष आयोजित केला जात आहे. या विशेष उपक्रमांतर्गत १२वीनंतर करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी २० एप्रिल ते १० मे २०२६ या कालावधीत सीईटी, नीट व विविध पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेवरील सविस्तर मार्गदर्शन सेमिनार घेतले जाणार आहे.

कॅम्पसदेखो डॉट एआय या उपक्रमात तंत्रज्ञान सहकार्यासाठी सहभागी असेल. मयादित जागा असल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी लगेचच नावनोंदणी करणे आवश्यक असणार आहे. नावनोंदणीशिवाय प्रवेश मिळणार नाही. १ रवीची परीक्षा दिलेले विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी प्रवेशप्रक्रियेसाठी मदत मिळविण्यासाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे. या सेमिनारमध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय, बी. फार्मसी, व्यवस्थापन, तसेच इतर सर्व पदवी अभ्यासक्रमांसाठी लागणारी संपूर्ण प्रवेशप्रक्रिया सोप्या भाषेत समजावून सांगितली जाणार आहे.

करिअरनिवडीसाठी योग्य मार्गदर्शन हा या उपक्रमाचा महत्त्वाचा भाग असून, विद्याध्यांची आवड, क्षमता, शैक्षणिक पार्श्वभूमी आणि भविष्यातील संधी यांचा विचार करून तज्ज्ञांकडून वैयक्तिक मार्गदर्शन दिले जाणार आहे. यामध्ये इंजिनीअरिंग सीईटी आणि NEET परीक्षांसाठीचे मार्गदर्शन, प्रवेश फेऱ्या, कट-ऑफ ट्रेंड, कॉलेज निवड, तसेच 'बेटरमेंट' आणि 'फ्रीज' यासारख्या पर्यायांचे सविस्तर स्पष्टीकरण दिले जाणार आहे. याशिवाय खासगी विद्यापीठे, डीम्ड विद्यापीठे आणि स्वायत्त महाविद्यालयांसाठी होणाऱ्या प्रवेश परीक्षा, त्यांची प्रक्रिया आणि संधी याबाबतही विद्यार्थ्यांना माहिती दिली जाणार आहे. शासन व खासगी शिष्यवृत्ती योजना, तसेच शैक्षणिक कर्ज मिळविण्याची प्रक्रिया यावरही सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. या उपक्रमात बँकांचा सहभाग असल्याने कर्जप्रक्रियेसही मदत मिळू शकेल. आवश्यक सर्व प्रवेशप्रक्रियांसाठी असलेली कागदपत्रे, त्यांची अचू‌कता, तपासणी आणि वेळेत सादरीकरण यासाठीही विद्यार्थ्यांना व पालकांना प्रत्यक्ष मदत मिळणार आहे. सीईटी होईपर्यंत या परीक्षेसाठी विशेष मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण साहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी अनुभवी तज्ज्ञ, शिक्षक, करिअर काउन्सेलर्स आणि प्रवेश मार्गदर्शक उपलब्ध असतील. विशेष सत्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शंका सोडविल्या जाणार आहेत, स्पर्धात्मक प्रवेशप्रक्रियेच्या काळात योग्य माहिती आणि योग्य मार्गदर्शन मिळणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने, 'पुढारी कॅम्पस टू करिअर अंतर्गत आयोजित हे सेमिनार १२ वीनंतर करिअर घडविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी निर्णायक ठरणार आहेत.

या शहरांत असणार सेमिनार

पुणे जिल्ह्यात बारामती, शिरूर, दौंड, खेड, इंदापूर, कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर, बिद्री, इचलकरंजी, वारणा, गडहिंग्जल, सांगली जिल्ह्यात सांगली, कवठेमहांकाळ, तासगाव, विटा, इस्लामपूर, सातारा जिल्ह्यात सातारा, कराड, फलटण, वाई तसेच नाशिक, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांत सेमिनार होणार आहे.

'पुढारी कॅम्पस टू करिअर' : नेमके काय मिळेल?

  • १२वीनंतर करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी संपूर्ण प्रवेश मार्गदर्शन,

  • इंजिनीअरिंग सीईटी, नीट, बी. फार्मसी, मॅनेजमेंटसह सर्व पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रक्रिया समजावून देणार.

  • करिअरनिवडीसाठी तज्ज्ञांकडून वैयक्तिक मार्गदर्शन. सीईटी व नीट परीक्षा तसेच प्रवेश फेऱ्यांसाठी स्टेप बाय स्टेप माहिती.

  • सीईट होईपर्यंत सातत्यपूर्ण विशेष मार्गदर्शन. खासगी, डीम्ड विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षांची माहिती.

  • शासन व खासगी शिष्यवृत्ती योजनांची सविस्तर माहिती. शैक्षणिक कर्जप्रक्रियेबाबत मार्गदर्शन.

  • प्रवेशासाठी आवश्यक सर्व कागदपत्रांची तपासणी व मदत अपार आयडी तयार करण्यासाठी प्रत्यक्ष साहाय्य.

सेमिनारमध्ये सहभागी होण्यासाठी...

  • विद्यार्थ्यांनी व पालकांनी नोंदणी करणे आवश्यक.

  • पुढारी कार्यालयात असलेला फॉर्म भरून देता येईल.

आकर्षक लकी ड्रॉ

कार्यक्रमाच्या शेवटी निवडक विद्यार्थ्यांना लकी ड्रॉद्वारे आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. यामध्ये एअर बर्ड, ब्लूटूद्ध डिव्हाइस आणि वाईल्ड क्राफ्ट बॅगचा समावेश आहे. त्याशिवाय निवडक विद्यार्थ्यांना नामांकित विद्यापीठांमध्ये कॅम्पस भेटीची संधी मिळणार आहे.

नोंदणीसाठी खालील वेबसाईटवर क्लिक करा

https://pudhari.campusdekho.ai/

अधिक माहितीसाठी संपर्क: ९५७००१७००३

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT