एज्युदिशा

सार्वजनिक बांधकाम विभाग : कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)भरती- २०१८

Pudhari News

महाराष्ट्र शासनाने मुंबई सार्वजनिक बांधकाम मंडळाला नोडल अधिकारी म्हणून कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी एकूण 263 पदासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावयाचे आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 27-05-2018 रात्री 12 पर्यंत आहे या पदाची परीक्षा 23 जून किंवा 24 जून 2018 अशी संभाव्य देण्यात आली आहे. या पदासाठी वेतनश्रेणी 9300-34800 (ग्रेड वेतन-4300)

शैक्षणिक पात्रता :-

1) कनिष्ठ अभियंता – वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे. उमेदवाराने शासनाने मान्यता दिलेली 3 वर्षे कालावधीची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका (Diploma in Civil Engineering) किंवा तिच्याशी समतूल म्हणून मान्यता मिळालेली अशी इतर कोणतीही अर्हता धारण करणे आवश्यक. मागासवर्गीय वयोमर्यादा- 43 वर्षे, अपंग-45 वर्षे, खेळाडू 5 वर्षे सवलत.

2) उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक, शासकीय व निमशासकीय सेवेतील कर्मचार्‍यांनी कार्यालय प्रमुखाच्या परवानगीने भरावेत.

परीक्षेचे स्वरूप :- ऑनलाईन परीक्षा

स्थापत्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम यावरती एकूण 75 प्रश्‍न व गुण 150 या विषयाचे माध्यम इंग्रजी असेल.

सामान्यज्ञान– यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, बुध्दिमापन, याघटकांचा समावेश यावरती एकूण 25 प्रश्‍न विचारण्यात येतील गुण 50 असतील. म्हणजेच एकूण 100 प्रश्‍न व 200 गुण व परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल. या परीक्षा पध्दतीमध्ये नकारात्मक गुण पध्दती नाही.

अभ्यासक्रम व संदर्भ ग्रंथ :-

Civil Engineering (Diploma Level) Building Constrvction andb Materials Machanics, Strength A Materials Thery of Structures, Structural analysis and steel structure Concert Technology, Design of reinforced Concrete Structure Per Stressed Concrete, Construetion planning and Management Surveying Estimating. Conting and valuation, Irrigation, Engineering Hydray;ics and Fluid Meebanios, Cteo Tcehinical Engineering Transportahon and Highway Engineering Docks, Harbours and  Airports awironmental Engineering.

यासाठी तुम्ही अभ्यासलेली Diploma ची पुस्तके समजून घेऊन पुन्हा वाचा Civil Engineering- Khurme, Gupta,  VgoM Civil Engineering-C.Agor.या पुस्तकांचा संदर्भ म्हणून उपयोग करू शकता. तुमची Degree झाली असेल तर GATE Civil  संदर्भ नक्‍की वाचा.

2) English:-  यामध्ये Simlar Word, Opposite Word, Common Vocabulory Sentenee Strueture, Grammar, use of Idiomsand Phrasos Their Meaning and Comprehensitn of Passage  यासाठी इंग्रजी व्याकरण बाळासाहेब शिंदे किंवा एम.जे. शेख सोबत A to Z Vocablery प्रा.सुदेश वेळापुरे सरांचा संदर्भ करा. आतापर्यंत झालेल्या आयोगाच्या इंग्रजी विषयांच्या प्रश्‍नपत्रिका चाळा.

3) मराठी – समानार्थी शब्द, विरूध्दार्थी शब्द तसेच सर्वसामान्य शब्द संग्रह वाक्यरचना व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार    याचा अर्थ आणि उपयोग तसेच उतार्‍यावरील  प्रश्‍न यासाठी- समग्र मराठी व्याकरण- मो.रा. वाळिंबे पुरेसे ठरेल.

4) सामान्यज्ञान– चालू घडामोडी- यासाठी अभिनव प्रकाशन व समाधान निमकर इतिहास महाराष्ट्र भुगोल पुस्तके व सोबत एकनाथ पाटील यांचे पुस्तक

5) बुध्दिमापन चाचणी- याघटकासाठी अभिनव प्रकाशन पठाण व सानप सरांचे पुस्तक व सोबत ईळहरपीं प्रकाशनाचे Test of Reasoning  हे पुस्तक चालेल. 

अभ्यासाची दिशा – परीक्षा 23 किंवा 24 जून 2018 रोजी असल्यामुळे  तुमच्याकडे कालावधी कमी आहे यामध्ये Civilघटकावरती 75  प्रश्‍न आहेत. या विषयाची तुमची ओळख असल्यामुळे लवकरात लवकर म्हणजे मे महिना अखेर पर्यंत हा विषय समजून घेऊन संपवून टाका. अधिकाधिक सराव व वस्तुनिष्ठ प्रश्‍न तयार करा. 25 प्रश्‍नांचा अभ्यासक्रम खूप मोठा आहे. यामध्ये साधारणतः4 घटकांसाठी प्रत्येकी 6 ते 7 प्रश्‍न विचारले जाऊ शकतात. यामध्ये प्रामुख्याने बुध्दिमापन, मराठी,इंग्रजी या विषयांना प्राधान्य द्या.

मराठी व इंग्रजी विषयांच्या प्रश्‍नपत्रिकांचा झालेला व स्पष्टीकरण करून दिलेला बाळासाहेब शिंदे सरांचा प्रश्‍नसंच सोडवा व त्या प्रश्‍नासोबतच तो घटक समजून घ्या. सामान्यज्ञान या घटकांचा आवाका फार मोठा आहे. त्यामुळे कमीत कमी वेळ व अचूक समजून घेऊन आल्यास यावर भर द्या. सामान्यज्ञानासाठी अधिक वेळ दिल्यास गणित  चूक शकते. या विषयाला अनुसरून विचारण्यासारखे भरपूर आहे. यामध्येसुध्दा प्रथम भूगोल, राज्यव्यवस्था. इतिहास, चालू घडामोडी अर्थव्यवस्था असा अभ्यासाचा क्रम लावा. अधिकाधिक सराव व मेमरी टेक्निकने अभ्यास करा. पारंपारिक अभ्यासपद्धती चालणार नाही स्मार्ट वर्क करा .                          

– जॉर्ज कु्झ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT