Career Opportunity File Photo
एज्युदिशा

Career Opportunity | कौशल्ये विकसित करा

करिअरमध्ये यश मिळवायचे असेल तर काही अंगभूत कौशल्ये विकसित करणे गरजेचे आहे. आजच्या घडीला टेक्निकल स्किल्सबरोबर पीपल स्किल्स विकसित करणेदेखील तितकेच महत्त्वाचे मानले जाते.

पुढारी वृत्तसेवा

Career Opportunity : आजकाल केवळ गुणवत्तेवर करिअर उभे राहात नाहीत. गुणवत्तेशिवाय अन्य कौशल्येदेखील तितकीच गरजेची मानली जात आहेत. पुस्तकी किडा असणाऱ्या कर्मचाऱ्यापेक्षा व्यवहारी ज्ञान आणि चौकस वृत्तीचा कर्मचारी हा कधीही कंपनीसाठी फायदेशीर असू शकतो.

ज्ञानाला व्यवहाराची जोड ठेवण्याचे कौशल्य बाळगणारा युवक यशस्वी होतो. कामाप्रती निष्ठेबरोबरच काम करण्याची तडफ, सखोल ज्ञान, नेतृत्व स्वीकारणाऱ्या, सांधिक भावना विकसित करणाऱ्या युवकाच्या करिअरची वाटचाल योग्यरीतीने होते.

लक्षपूर्वक ऐका : आजच्या जॉबच्या मार्केटमध्ये काळजीपूर्वक, लक्षपूर्वक ऐकणे ही बाब महत्त्वाची मानली जाते. जर एखादी व्यक्ती आपल्याला काही सांगत असेल तर त्याची प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक ऐकणे गरजेचे आहे. जर आपण त्याच्या बोलण्याकडे, म्हणण्याकडे लक्ष दिले तर संवादाची प्रक्रिया यशस्वी होऊ शकते. यातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांचीदेखील उकल होऊ शकेल. त्यांच्या बोलण्यांकडे लक्ष दिले नाही तर अवांतर ज्ञान घेण्याची प्रक्रिया खंडित होऊ शकते.

सकारात्मक दृष्टिकोन : सकारात्मक दृष्टिकोन आपण विकसित केला तर प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकतो. आपला पाहण्याचा दृष्टिकोन चांगला, सकारात्मक असेल तर आपल्याला नवीन संधी, आव्हाने निर्माण होतील, यानुसार आपण सकारात्मक दृष्टिकोनातून काम केल्यास त्याचे परिणामही चांगले होतात. सकारात्मकतेने शरीरातील ऊर्जाही त्याच दिशेने काम करण्यास आपल्याला प्रेरित करते.

स्पष्टता असणे : जर आपण कोणताही संदेश, निरोप किंवा काम योग्यरीतीने स्पष्ट केले नाही तर कंपनी अनेक प्रकल्पात अयशस्वी ठरू शकते. यासाठी प्रत्येक गोष्ट ऐकताना आणि सांगताना स्पष्टता असणे गरजेचे आहे. प्रत्येक निरोप, संदेश गांभीयनि ऐकणे आणि तो संबंधितांपर्यंत पोचवणे गरजेचे आहे. याप्रमाणे आपण लवकर ध्येय साध्य करू शकतो. कंपनीचे ध्येयधोरण कनिष्ठ पातळीपर्यंत कसे पोहोचेल याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. यात अडथळा प्रियांका जाधव आणणाऱ्या गोष्टी दूर करणे आवश्यक आहे.

टीम बिल्डिंग स्किल : टीम प्लेअर हा टीम लीडर होतो. आपल्याला करिअरला उंची द्यायची असेल तर टीम बिल्डिंग स्किल विकसित करणे आवश्यक आहे. टीम प्रोजेक्टवर काम करताना या कौशल्यावर भर देणे गरजेचे आहे. नेतृत्वगुणाची क्षमता राखणारा युवकच यशस्वी करिअर करू शकतो.

जबाबदारी स्वीकारणे : प्रामाणिक, जोखीम पत्करणारा, जबाबदारी उचलणारा कर्मचारी कंपन्यांना हवा असतो, विपरीत परिस्थितीतही सकारात्मक राहून कंपनीचे ध्येय गाठण्यास हातभार लावणारा कर्मचारी कंपनीला पसंत असतो. अपयशाची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलण्यापेक्षा स्वतः स्वीकारणारा कर्मचारी हा कंपनीला विश्वासू वाटतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT