कोणती तरी परदेशी भाषा अवगत असावी असे बरेचजणांना वाटत असते. आजच्या ग्लोबल युगात तर ती गरजच बनली आहे. तेव्हा अशी एखादी भाषा शिकायची इच्छा असेल तर त्याच्या क्लासला जाणे अपरिहार्य आहे, असे वाटत असेल तर जरा थांबा. आता फ्रेंच भाषा शिकायला कोणत्याही क्लासला जायची गरज नाही.
घरबसल्या तुम्ही ही भाषा शिकू शकता. त्यासाठी फक्त एका वेबसाईटला तुम्हाला भेट द्यावी लागेल. फ्रेंच शिकण्यासाठी कार्यरत असलेल्या इंडो- फ्रेंच सांस्कृतिक केंद्र अलियांज फ्रान्सिस, ज्याची एक शाखा भोपाळमध्ये आहे त्यांनी ऑनलाईन फ्रेंच कोर्स सुरू केला आहे. 'क्लिक ऑन फ्रेंच' नावाच्या या कोर्सद्वारे तुम्ही घरी बसून फ्रेंच शिकू शकता. या केंद्राच्या वेबसाईटवरून हा कोर्स तुम्ही डाऊनलोडही करू शकता. 'क्लिक ऑन फ्रेंच' हा फ्रेंच आणि भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने चालवला जाणारा कोर्स आहे.
आलियांज फ्रान्सिसी यांच्या वेबसाईटवर त्याचा डेमो पहायला मिळतो. त्याद्वारे या कोर्सची सगळी माहिती प्राप्त करून घेता येईल. या कोर्समध्ये फ्रेंच भाषेतील सर्वकाही शिकायची संधी आहे. हे शिक्षण मल्टिमीडिया कन्टेंटद्वारे दिले जाते. त्यामुळे फ्रेंच शिकायला फारशी अडचण येत नाही. शिवाय तुमच्या स्पीडने तुम्ही ही भाषा शिकू शकता. त्यामुळे ना स्पर्धेचे भय वाटेल ना गडबडीत कोर्स पूर्ण करण्याची गरज राहील.
तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही फ्रेंच भाषा शिकू शकता. या वेबसाईटमध्ये हसत खेळत शिक्षणावर भर दिला गेला आहे. त्यात फोटो, गेम, साऊंड फाईल अशा अनेक गोष्टींची रेलचेल आहे. त्यात 200 पेक्षा अधिक वेगवेगळ्या टेस्ट (भाषेचे एक्सरसाईज) आणि 300 पेक्षा जास्त साऊंड फाईल उपलब्ध आहेत.
भाषेतील शब्दोच्चार आणि त्यांची अक्षरे यांचा अभ्यास करायला या साऊंड फाईलचा खूप उपयोग होतो. एवढं करूनही पर्सनल टच शिवाय ही भाषा शिकणे अवघड आहे असे कोणाला वाटत असेल किंवा अधिक खोलात जाऊन त्या भाषेचा अभ्यास करायचा असल्यास गाईड किंवा ट्यूटरही या वेबसाईटद्वारा उपलब्ध करून दिला जातो. हा कोर्स पूर्ण झाल्यावर तुम्हाला त्याचे प्रमाणपत्र किंवा सर्टिफिकिटही दिले जाईल.
ते कोणत्याही देशात ग्राह्य धरले जाईल. या कोर्समध्ये पहिले दोन भाग कोणतेही शुल्क न स्वीकारता शिकवले जातात तर पुढच्या भागांसाठीचे पॅकेज मात्र सशुल्क आहे.
आलियांज फ्रान्सिसची वेबसाईट आहे www.afindia.org तर फ्रेंच भाषा शिकण्यासाठी जी वेबसाईट तुम्हाला उपयोगी पडणार आहे ती आहे www.clickonfrench.com