एज्युदिशा

न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय

Pudhari News

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय महारष्ट्र राज्य यांच्या अधिपत्याखाली मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, नांदेड व कोल्हापूर प्रयोगशाळेतील गट क व गट ड संवर्गातील सरळसेवेतील रिक्तपदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 12 एप्रिल 2018 ही अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आहे.

भरावयाची पदे – 1 वैज्ञानिक सहायक (गट क) – 20 पदे, 2) वैज्ञानिक सहायक (संगणक, गुन्हे व ध्वनीफित विश्‍लेषण) गट क – 73 पदे, 3) वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक  (गट-क) – 10 पदे, 4) वरिष्ठ लिपिक (भांडार) गट – क – 2 पदे, 5) कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक गट – क – 7 पदे, 6) लिपिक टंकलेखक (गट क) – 12 पदे, 7) वाहनचालक (गट क) – 3 पदे, 8) दूरध्वनीचालक (गट क) – 1 पद, 9) प्रयोगशाळा परिचर गट – ड – 9 पदे, 10 चपराशी (गट ड) – 3 पदे.

पात्रता : 1) वैज्ञानिक सहायक – विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र विषयासह मान्यताप्राप्त विद्यापीठाची कमीत कमी दुसर्‍या वर्गात पदवी उत्तीर्ण अथवा न्यायसहायक विज्ञान विषयासह विज्ञान शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची कमीत कमी दुसर्‍या वर्गात पदवी उत्तीर्ण.

2) वैज्ञानिक सहायक – विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र किंवा संगणकशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान या विषयासह किमान द्वितीय श्रेणीतील पदवी किंवा अभियांत्रिकी शाखेतील संगणकशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान या विषयासह किमान द्वितीय श्रेणीतील पदवी उत्तीर्ण किंवा इB.Sc (Forensic Science) किंवा Post Graduate Diploma in digital and cyber forensic and related law.

3) वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक – (HSC) विज्ञान परीक्षा उत्तीर्ण.

4) वरिष्ठ लिपिक – विज्ञान शाखेत उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (कडउ) विज्ञान उत्तीर्ण.

5) कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक – विज्ञान विषयासह माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र (डडउ) उत्तीर्ण.

6) लिपिक टंकलेखक – कोणत्याही शाखेची पदवी किंवा शासनाने समतुल्ल म्हणून घोषित केलेली अन्य अर्हता. शासकीय वाणिज्य मंडळाची इंग्रजी 40 शब्द प्र. मि. टंकलेखन किंवा मराठी 30 श. प्र. मि. टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण.

7) वाहनचालक – माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण (SSC) हलके किंवा मध्यम किंवा जड वाहन चालविण्याचा परवाना धारण आवश्यक. वाहन चालविण्याचा 3 वर्षांचा अनुभव.

8) दूरध्वनीचालक ः SSC  उत्तीर्ण, दूरध्वनी प्रशिक्षणाचे मान्यताप्राप्त शासकीय संस्थेचे प्रमाणपत्र. मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे प्रभूत्व.

9) प्रयोगशाळा परिचर ः 10 वी नापास.

10) चपराशी ः 10 वी उत्तीर्ण.

परीक्षाशुल्क ः वरील सर्व पदांकरिता अमागास प्रवर्गासाठी 500 रुपये. मागासवर्गीय उमेदवार 250 रुपये, माजी सैनिकांना शुल्क नाही. वयोमर्यादा – 24 मार्च 2018 रोजीचे गणले जाईल. खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे, मागासवर्गीयांसाठी 43 वर्षे, शासकीय कर्मचार्‍यांना कमाल व वयोमर्यादेची अट नाही.

अभ्यासक्रम ः 1 ते 4 पर्यंतच्या पदासाठी मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, बुद्धीमत्ता चाचणी विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, संगणकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान, न्यायसहायक इ. किमान शैक्षणिक अर्हतेनुसार प्रश्‍न विचारण्यात येतील. प्रत्येक घटकासाठी 40 प्रश्‍न म्हणजे 200 प्रश्‍न 200 गुण संगणकावर परीक्षा घेण्यात येईल. प्रश्‍नपत्रिका वस्तुनिष्ठ स्वरूपाची असेल.

2) कनिष्ठ प्रयोगशाळा दूरध्वनी चालकसाठी मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, बुद्धीमापन असे घटक असतील. एकूण 200 प्रश्‍न 200 गुण. ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची असेल.

वाहन चालकपदासाठी – मराठी, सामान्यज्ञान, वाहतूक नियम यावर प्रश्‍न एकूण 60 प्रश्‍न 60 गुण असतील. संगणकावर परीक्षा घेतली जाईल.

4) प्रयोगशाळा परिचर व चपराशी यासाठी मराठी व सामान्यज्ञान या दोन घटकांवरती 100 प्रश्‍न व 100 गुणांची परीक्षा असेल.

संदर्भ साहित्य ः मराठी ः संपूर्ण मराठी व्याकरण – बाळासाहेब शिंदे, इंग्रजी – बाळासाहेब शिंदे, सामान्यज्ञान – नवनीत जनरल नॉलेज, बुद्धीमापन – अनिल अंकलगी, विज्ञानसाठी – कृषिगंगा विज्ञान, फॉरेन्सिकसाठी – मुकुंद प्रकाशन.

10 वी पास व नापासपदासाठी तेज प्रकाशनाचे सामान्यज्ञान पुस्तक उपयुक्त ठरेल. परीक्षा दिनांक – 27 एप्रिल ते 30 एप्रिल 2018 या दरम्यान होईल


अधिक माहितीसाठी www.mahapariksha.gov.in किंवा शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट द्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT