एज्युदिशा

चिप डिझायनिंग आधुनिक करिअर पर्याय | पुढारी

Pudhari News

सतीश जाधव

इंजिनिअरिंगमध्ये करिअर करण्याची आवड आहे, आव्हानात्मक काम पेलण्याची तयारी आहे. मग तुमच्यासाठी चिप डिझायनिंग हा एक उत्तम पर्याय आहे. चिप सिलिकॉनचा एक छोटा पातळ तुकडा मशिनच्या इंटिग्रेटेड सर्किट बेसचे काम करत असतो. मात्र, चिप डिझायनर त्याच्या मदतीने मोठ्या आकारातील उपकरणांनाही छोट्या आकारात बदलतो. म्हणूनच चिप डिझायनरची मागणी सध्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वाढत आहे. चिप डिझायनरचे मुख्य काम म्हणजे छोट्या किंवा मोठ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची कार्यक्षमता वाढवून ती वापरण्यास सुलभ बनवणे. टीव्ही रिमोट, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, ऑटोमोबाईल सेक्टर या सर्व क्षेत्रांमध्ये चिपचा वापर मोठ्या प्रमाणावर होत 

आहे. या इंडस्ट्रीमध्ये डिझाईन इंजिनिअर, प्रॉडक्ट इंजिनिअर, टेस्ट इंजिनिअर, सिस्टिम्स इंजिनिअर, प्रोसेस इंजिनिअर, पॅकेजिंग इंजिनिअर, सीएडी इंजिनिअर आदी स्वरूपात काम करता येऊ शकते. 

तुम्हाला काय यायला हवं?

चिप डिझायनिंगमध्ये करिअर करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये बीई किंवा बीटेकची पदवी मिळवलेली असावी. चिप डिझायनिंगमध्ये विशेषत: डिझाईन, प्रॉडक्शन, टेस्टिंग, अ‍ॅप्लिकेशन्स आणि प्रोसेस इंजिनिअरिंगचा समावेश असतो. या क्षेत्रासाठी काही संस्थांमध्ये शॉर्ट टर्म कोर्सेसही उपलब्ध आहेत, ज्यांचा संबंध हा आयसी, सर्किट डिझाईन आणि मायक्रो प्रोसेसशी असतो. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी काही आवश्यक कौशल्ये असणे गरजेचे आहे. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचे विशेष ज्ञान असावे. त्याशिवाय उत्तम संवाद कौशल्य, टीम वर्क, समस्या सोडविण्याची क्षमता, तसेच प्रोग्रॅमिंग आणि मॅथेमॅटिकल कौशल्य यांसारख्या गोष्टींची आवश्यकता असते. टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंटस् आणि आधुनिक इनोव्हेेशनचे विशेष ज्ञान असणे आवश्यक आहे. 

काही प्रमुख संस्थांमध्ये या क्षेत्राशी निगडित कोर्सेस चालवले जातात. त्यामध्ये बिटमॅपर इंटिग्रेेशन टेक्नॉलॉजी पुणे, सेंट्रल फॉर डेव्हलपमेंट ऑफ अ‍ॅडव्हान्स कॉम्प्युटिंग, बंगळूर, जामिया मिलिया इस्लामिया, नवी दिल्ली या त्यातील काही प्रमुख संस्था आहेत.

SCROLL FOR NEXT