व्यवस्थापनात करिअरचे पर्याय Pudhari photo
एज्युदिशा

Career Management : असे निवडा व्यवस्थापनात करिअर

पुढारी वृत्तसेवा
निखिल म्हात्रे

मागील काही वर्षापासून मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम करण्याकडे विद्याथ्यांचा कल वाढल्याचे चित्र आहे. एवडेच नव्हे, तर तांत्रिक कोर्स पूर्ण केलेले विद्यार्थीदेखील या कोर्सकडे वळत आहेत. असे होण्याचे कारण म्हणजे, आज सगळ्याच छोट्या- मोठ्या कंपन्यांना त्यांचा व्यवसाय संभाळण्यासाठी मॅनेजमेंट प्रशिक्षितांची आवश्यकता भासू लागली आहे.

बारावीनंतर करण्यात येणारे कोर्स

बीबीए

बीवीए म्हणजे बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन हा एक अंडर ऍज्युएट डिग्री कोर्स आहे. हा कोर्स विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या मॅनेजमेंट सिद्धांतांबद्दल एकस्पर्ट बनविण्याचे काम करतो, हा कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना मार्केटिंग, अकाउंटिंग, फायनान्स आणि इंटरनॅशनल बिझनेससह विविध क्षेत्रांमध्ये नोकरी मिळू शकते. देशातील अनेक संस्थांमध्ये सध्यादेखील हा कोर्स चालविण्यात येत असून, येथे प्रवेश परीक्षेच्या आधारावर प्रवेश घेता येऊ शकतो. काही संस्था १२ वीमध्ये ५० ते ६० टक्के असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देतात.

बीबीएस (बॅचलर ऑफ बिझनेस स्टडीज)

हादेखील अंडर ग्रॅज्युएट कोर्स असून, याचे शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना कोणत्याही कॉर्पोरेट सेक्टर कंपनीमध्ये मॅनेजर पदाच्या समकक्ष नोकरी मिळू शकते. इंग्रजी विषयात ६० टक्के गुण अथवा कोणत्याही स्ट्रीममधील १२ उत्तीर्ण विद्यार्थी या कोर्ससाठी प्रवेश घेऊ शकतो. देशातील अनेक विद्यापीठांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये हा कोर्स उपलब्ध हे आहे.

बीएमएस (बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज)

बीबीएप्रमाणे हादेखील एक अंडर ग्रॅज्युएट मॅनेजमेंट कोर्स असून, हा तीन वर्षाचा आहे. यामध्ये १२ उत्तीर्ण झालेले विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात

बीबीई (बॅचलर ऑफ ब्रिड्रानेस इकोनॉमिक्स)

कोणत्याही शाखेतून बारावीची परीक्षा ६० टक्क्यांनी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी यामध्ये प्रवेश घेऊ शकतो. विविध महाविद्यालयांमध्ये हा कोर्स उपलब्ध असून, प्रवेश परीक्षेच्या आधारावर येथे विद्याथ्यांना प्रवेश दिला जातो.

बीएफआयए (बॅचलर ऑफ फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट अँड अॅनालिसिस)

१२ नंतर विद्यार्थी हा पदवीस्तरीय प्रोफेशनल कोर्स करू शकतो. बीएमएस, बीबीईप्रमाणेच बीएफआयएमध्ये प्रवेश परीक्षेच्या आधारावर प्रवेश घेता येऊ शकती. देशातील सर्व महाविद्यालयांत हा कोर्स उपलब्ध आहे.

पदवीनंतरचे कोर्स

एमबीए (फुलटाईम)

एमबीए म्हणजे, मॅनेजमेंट ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन होय. या कोर्समध्ये कोणत्याही प्रकारचा व्यवसाय कसा चालवावा याबद्दल यावर सखोल मार्गदर्शन केले जाते, ज्यामध्ये विद्यार्थांना मॅनेजमेंटच्या सर्व विषांमध्ये निपुण बनवण्याबरोबरोच एका विषयात एक्स्पर्ट बनवले जाते. एमबीए रेग्यूलर कोसमध्ये प्रवेशासाठी आर्टस्, कॉमर्स अथवा विज्ञान विषयामध्ये कमीत कमी ६० टक्के गुण घेऊन ग्रॅज्युएट उत्तीण होणे गरजेचे आहे. याच्यासोबत मॅनेजमेंट प्रोग्राममध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असणारी कँट मॅट, सीमेंट, स्नॅप किवा जी मँट यासारख्या प्रवेश परीक्षा पास करणेदेखील आवश्यक असते. कारण, आयआयएमसह चांगल्या संस्थांमध्ये याच परिक्षांमधील गुण चमूर प्रवेश देण्यात येतो.

एमबीए (एक्झिक्युटिव्ह)

एमबीए (एक्झिक्युटिव्ह) याला कार्यकारी एमबीए या नावानेदेखील ओळखले जाते. हा डिग्री कोर्स आहे. मुख्यतः, अधिकारी, मॅनेजर, उद्योजक आणि अन्य व्यापार जगताशी संबंधित व्यक्तींना व्यवस्थापनाचे धडे देण्यासाठी हा कोर्स तयार करण्यात आलेला आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी उमेदवार कमीत- कमी पदवीधारक आणि कामाच्या अनुभव असणे गरजेचा आहे. हा कोर्स एक ते दोन वर्ष कालावधीचा आहे.

पीजीडीबीएम (पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट)

हा पीजी डिप्लोमा कोर्स असून, एआयसीटीईद्वारा मान्यताप्राप्त पीजीडीबीएम किंवा पीजीडीएम फुलटाईम कोर्सदेखील एरबीए डिग्रीच्या समकक्ष मानला जातो. इग्नूसह देशातील विभिन्न संस्थांमध्ये हा कोर्स रेग्युलर आणि दूरस्थ माध्यमातून करता येऊ शकतो. कोणाचाही विषयातील ६० टक्के गुण मिळवून पदवी उत्तीर्ण असलेला उमेदवार यासाठी प्रवेश घेऊ शकतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT