Fine Arts  Pudhari Online
एज्युदिशा

Fine Arts | फाईन आर्टसमधील करिअर

शाळा ते कॉलेज यादरम्यानच्या शैक्षणिक प्रवासात विद्यार्थी आणि पालकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित राहतात.

पुढारी वृत्तसेवा

शाळा ते कॉलेज यादरम्यानच्या शैक्षणिक प्रवासात विद्यार्थी आणि पालकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित राहतात. पालकांच्या इच्छेनुसार करिअर करावे का? करिअरची वाट स्वतः निवडावी का? ज्या ठिकाणी प्रवेश मिळतो, त्या अभ्यासक्रमात करिअर करावे का, की मित्रमंडळी जे करत आहेत, त्यात करिअर करावे का?

असंख्य प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात उपस्थित राहतात. परंतु, स्वतःच्या मनाला काय वाटते आणि आपण कलेला कसा वाव देतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरते आणि हाच विद्यार्थी पुढे सेलिब्रिटी बनतो. साहजिकच ते फॅशन नाही, तर पेंशनसाठी काम करत असतात.

जेव्हा आपल्या आवडीचा छंद हा करिअरचा भाग बनतो तेव्हा आपले योगदान शंभर टक्क्यांपेक्षा अधिक राहते. पर्यायाने यश मिळवण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही. हे असेच एक पॅशन आहे ते म्हणजे आर्ट (कला) होय. हौस म्हणून जोपासलेली ही कला पुढे करिअरसाठी उपयुक्त ठरते. यातून समाधान आणि प्रसिद्धीही मिळते. या क्षेत्रात करिअर करण्याच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत.

अतिरिक्त कौशल्य :

कलेत करिअर करण्यासाठी उमेदवाराकडे अतिरिक्त कौशल्य असणे गरजेचे आहे. उमेदवार हा रचनात्मक आणि कल्पनाशील असायला हवा. त्याचबरोबर तो धैर्यवानही हवा. त्याचे बारीकसारीक गोष्टीवर लक्ष असते. त्याच्या डोळ्यात आणि हातात अनोखा ताळमेळ असतो.

संधी :

फाईन आर्ट व्यावसायिकास आर्ट स्टुडिओज, जाहिरात संस्था टेक्सटाईल उद्योग, प्रकाश संस्था, टेलिव्हिजन, फिल्म आणि थिएटर प्रॉडक्शन यात संधी मिळते. याशिवाय शिक्षक रूपातून देखील पर्याय उपलब्ध आहे. आर्ट क्रिटिकच्या रूपातून लिखाणाचे क्षेत्र निवडता येते.

वेतन :

आर्ट प्रोफेशनल्सचे वेतन कामाच्या स्वरूपावर अवलंबून असते. मीडिया किंवा प्रकाशन संस्था, जाहिरात संस्था आणि टेक्सटाईल उद्योगात काम करणाऱ्या कलाकारांना १२ हजार ते २५ हजारांपर्यंत दरमहा वेतन मिळते.

प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम करणाऱ्यांना २० हजारांपर्यंत मासिक वेतनातून सुरुवात करता येते. शिक्षक म्हणून क्षेत्र निवडणाऱ्या कलाकारांचे वेतनही चांगले असते. अभ्यासक्रम आणि

पात्रता :

चित्रकला आणि अप्लाईड आर्टच्या चार-चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम बीएफए (बॅचलर इन फाईन आर्ट) साठी विद्यार्थ्याला बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. त्यात २-२ वर्षाच्या एमएफए (मास्टर्स इन फाईन आर्ट) च्या पदवी अभ्यासक्रमासाठी कोणत्याही शैक्षणिक संस्थेतील पदवीधारक असावा. याशिवाय डिप्लोमा कोर्सदेखील उपलब्ध आहेत. पेटिंग आणि अप्लाईड आर्ट विथ ग्राफिक डिझायनिंगचे चार-चार वर्षाचे डिप्लोमा अभ्यासक्रम (डिएफए) साठी विद्यार्थ्याला बारावी पास असणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT