एज्युदिशा

Academic Bank of Credits आता पदविका तंत्रशिक्षणाचा प्रवास होईल सोपा

मोहसीन मुल्ला

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ बदलत्या काळानुरुप तंत्रज्ञानातील बदलानुसार अभ्यासक्रमात बदल किंवा सुधारणा करित असते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- २०२० मध्ये शिक्षणाचा दर्जा वाढवण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या हिताचा आणि त्यांच्या विकासाचा विचार करण्यात आला आहे. या अनुषंगाने MSBTE ने त्यांचा नवा अभ्यासक्रम K Scheme मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या (National Education Policy-2020) तरतूदींचा अंतर्भाव केला आहे. ज्याची अंमलबजावणी जून २०२३ पासून सुरू झाली असून डिसेंबर २०२५ पर्यंत टप्याटप्याने ती पूर्ण करण्यात येईल.

MSBTEच्या K Scheme अभ्यासक्रमात मातृभाषेत शिक्षण, Multiple Entry व Multiple Exit, औद्योगिक प्रशिक्षणाच्या कालावधीत वाढ, Indian Knowledge System चा अभ्यासक्रमात अंतर्भाव, योगा आणि मेडिटेशनचा नियमित सराव, पर्यावरण संवर्धन आणि आर्थिक साक्षरता या बाबींचा समावेश तसेच लोकशाहीची मुल्ये रूजवण्यासाठी संविधानावर आधारित 'Essence of Indian Constitution' या विषयाचा समावेश असे अनेक अमुलाग्र बदल केले आहेत. यातील आणखी एक महत्त्वाची तरतूद म्हणजे Academic Bank of Credits होय.

K Scheme अभ्यासक्रमात Academic Bank of Credits म्हणजेच ABC Credit System चा समावेश केला आहे. ज्यात विद्यार्थ्यांना प्रत्येक सत्रासाठी क्रेडिट नेमून दिले जातील. या क्रेडिटद्वारे विद्यार्थ्याने शिकलेल्या अभ्यासक्रमाला महत्त्व देण्यात आले आहे. अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना प्रत्येक विद्यार्थ्याचे एक डिजिटल खाते सुरू होईल. ज्यात त्याने जो अभ्यासक्रम पूर्ण केला त्यानुसार क्रेडिट्स डिजिटल पद्धतीने विद्यार्थ्यांच्या ABC (Academic Bank of Credits) खात्यामध्ये जमा होतील. विद्यार्थ्यांना त्यांनी पूर्ण केलेल्या प्रत्येक सत्राचे क्रेडिट मिळण्याची तरतूद केली आहे. इतकंच नाही तर हे क्रेडिट्स एका संस्थेतून दुसऱ्या संस्थेत सहजपणे हस्तांतरित करता येतील. यामुळे इतर शिक्षण घेताना पूर्ण केलेले विषय पुन्हा शिकण्याची गरज नसल्याने अतिरिक्त शिक्षणात गती प्राप्त होईल.

MSBTE च्या अभ्यासक्रमात ABC Credit System चा समावेश केल्याने विद्यार्थ्यांना गुणवत्तेची हमी मिळणार आहे. अभ्यासक्रमातील अनावश्यकता टाळली जाते. विद्यार्थ्यांनी कमावलेली क्रेडिट्स ही विशिष्ट मानकांची पूर्तता केल्याची खात्री असते. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा कायम राखण्यास मदत होते. या क्रेडिट्समुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि व्यावसायिक करिअरमध्ये गतिशीलता येईल. अशा पद्धतीची विद्यार्थ्यांना Credit देणारी System ही जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त मुल्यांकन करणारी पद्धत आहे.

प्रत्येक पालकाला आपल्या पाल्याच्या करिअरमध्ये सुरक्षितता हवी असते. त्याच बरोबर मुलांनी स्वत:च्या क्षमतेवर प्रगती करून लक्ष्य गाठावे अशी इच्छा असते. MSBTE च्या K Scheme अभ्यासक्रमातील ABC Credit System हा उपक्रम तंत्रशिक्षण सोपे करण्यास मदत करतो. म्हणूनच विद्यार्थी आणि पालकांनी MSBTE चा नवा अभ्यासक्रम K Scheme याचे स्वागत करावे आणि उत्तम करिअरचा एक पर्याय म्हणून त्याचा विचार करावा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा www.msbte.org.in किंवा www.dte.maharashtra.gov.in

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT