Youth crime case | लहान वयात मुडदे पाडण्याची धाडस येते कुठून? 
क्राईम डायरी

Youth crime case | लहान वयात मुडदे पाडण्याची धाडस येते कुठून?

वस्त्रनगरीत अल्पवयीन गुन्हेगारीत : पोलिस प्रशासनाची जरब संपल्याचीच स्थिती

पुढारी वृत्तसेवा

संदीप बिडकर

इचलकरंजी : ओमकार कांबळे याच्यावर केलेला गोळीबार वस्त्रनगरीला हादरवणारा ठरला. गोळीबार करणारे अनुराग सूर्यवंशी आणि ओमकार शेंडे हे दोघेही कमी वयाचे आहेत. त्यामुळे एखाद्याच्या जीवावर उठण्याचे धाडस कमी वयात येतेच कुठून, हा संशोधनाचा विषय आहे. धारदार शस्त्राने केलेला वार आणि गोळीबारातून झालेला रक्तपात हृदय हेलावून टाकणारा होता. हे थांबायचे कसे, हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

जबरी चोर्‍या, खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी यामध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार अग्रेसर आहेत. परंतु या टोळ्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग चिंताजनक आहे. ओठावर मिसरुडही न फुटलेली मुले हातात कोयता, धारदार शस्त्रे, कट्टा घेऊन पोलिसांसमोरच बिनदिक्कत जीवघेणे हल्ले करीत आहेत. रेकॉर्डवरील गुन्हेगार व नवीन उपनगरामध्ये वाढलेली गुन्हेगारी ही डोकेदुखी ठरत आहे. अल्पवयीन मुलांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये गांजा, नशिल्या गोळ्या याचा सर्रास वापर होताना दिसत आहे. आपण काय करीत आहोत याचेच भान या नशेमुळे राहात नसल्यामुळे ते बेदरकारपणे अल्पशा पैशावर कोणताही गुन्हा सहजपणे करण्यास तयार असतात.

संशयितांची पार्श्वभूमी ही सर्वसामान्य असल्यामुळे शिक्षणाचा अभाव, पालकांचे दुर्लक्ष ही कारणे आहेत. इचलकरंजीमध्ये 168 मोका गुन्हेगार आहेत. काहीजण डबल, तिबल मोका याचे मनसबदार आहेत. हे गुन्हेगार जामिनावर व कायद्याच्या पळवाटा वापरून बाहेर येत असल्याने या घटनांमध्ये वाढ होत आहे.

इचलकरंजीत कोम्बिंग ऑपरेशनची गरज

गोळीबार झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हेगार मनीष नागोरी याच्या घरावर छापा टाकला. त्याच्याकडे जिवंत राऊंड व 865 ग्रॅम एमडी ड्रग्ज सापडले. परंतु गोळीबार झाल्यानंतरच कारवाई का? यापूर्वी पोलिसांना हे माहिती नव्हते का, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. त्यामुळे शहरामधील मोका व इतर गुन्हेगारांवर कोम्बिंग ऑपरेशन राबवण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT