येथील ग्रामीण रुग्णालयात मुदत बाह्य झालेल्या औषधांसोबत मुदत न संपलेली औषधेही जाळल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. Pudhari News Network
क्राईम डायरी

Wani Rural Hospital : मुदत बाह्य झालेल्या औषधजळीत प्रकरणात चौकशीही वरवरचीच ?

Nashik Wani News वणी ग्रामीण रुग्णालयातील प्रकार; नागरिकांत संताप

पुढारी वृत्तसेवा

Medical Scam : Wani Government Rural Hospital News

वणी (नाशिक) : येथील ग्रामीण रुग्णालयात मुदत बाह्य झालेल्या औषधांसोबत मुदत न संपलेली औषधेही जाळल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दैनिक ‘पुढारी’ने यासंदर्भात वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने चौकशीचे आदेश दिले होते. मात्र, ही चौकशी वरवरची असल्याचे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या पाहणीत समोर आले आहे.

मुदतबाह्य औषधांची उघड्यावर विल्हेवाट या मथळ्याखाली दैनिक पुढारीने दि. 6 ऑगस्ट रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते.

रुग्णालयातील औषधांच्या विल्हेवाटीबाबतची ही गंभीर चूक आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. या प्रकरणी दोषींवर कोणती कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

काय घडलं?

मंगळवार (दि. ५) वणी ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात मुदत बाह्य औषधे उघड्यावर जाळून त्यांची विल्हेवाट लावण्यात आल्याचा प्रकार घडला होता. याविषयी वृत्त प्रकाशित झाल्यानंतर उपसंचालक विभागाकडून सहाय्यक संचालक डाॅ. योगेश चित्ते व जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डाॅ. संदीप सुर्यवंशी यांच्यासह एक चौकशी समिती वणीत दाखल झाली. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

चौकशी की केवळ दिखावा?

ही चौकशी समिती परत गेल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी पुन्हा घटनास्थळाची पाहणी केली. त्यावेळी त्यांना अनेक अर्धवट जळालेली औषधे आढळली. त्यांची तपासणी केली असता, त्यातील काही औषधांची मुदत संपलेली नव्हती असे आढळून आले. याबाबत पुन्हा चौकशी समितीला बोलवून हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला. या घटनेमुळे रुग्णालयाच्या प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 'सर्व औषधांची तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करू, कुणालाही पाठीशी घालणार नाही,' असे चौकशी समितीने सांगितले असले तरी, ही कारवाई केवळ 'वरवरची' असल्याचा आरोप होत आहे.

Nashik Latest News

वणी : ग्रामीण रुग्णालय आवारात उघड्यावर जाळण्यात आलेली मुदतबाह्य औषधे.

मुदतबाह्य औषधांची उघड्यावर विल्हेवाट : वणी ग्रामीण रुग्णालयाचा निष्काळजीपणा उघड

वणी : येथील ग्रामीण रुग्णालयाकडून मुदतबाह्य औषधांचा साठा थेट उघड्यावर जाळून विल्हेवाट लावण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना ५ ऑगस्ट २०२५ रोजी साडेअकरा वाजता रुग्णालयाच्या आवारात घडली. नागरिकांनी यास तीव्र विरोध दर्शवत, यामुळे सार्वजनिक आरोग्यासह पर्यावरणालाही धोका निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली आहे.

गोळ्या, इंजेक्शन्स तसेच इतर वैद्यकीय साहित्याचे नियमांनुसार योग्य वर्गीकरण करून सुरक्षित पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्यक असते. मात्र, रुग्णालय प्रशासनाने कोणतीही पूर्वतयारी न करता हा साठा उघड्यावरच जाळला. विशेष म्हणजे, नागरी वस्तीजवळ हा प्रकार घडला. केमिकलयुक्त धुरामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. वणी ग्रामीण रुग्णालय हे नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत राहिले आहे. यापूर्वीही येथे वैद्यकीय अधिकारी, औषध वितरण, वीजपुरवठा, स्वच्छता या बाबतीत अनेक समस्या उघडकीस आल्या आहेत. आता या मुदतबाह्य औषधांच्या निष्काळजीपणामुळे पुन्हा एकदा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

मुदतबाह्य औषधे उघड्यावर टाकल्याने सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण होतो. ही औषधे मुलांना किंवा कचरा वेचकांना सहज सापडून चुकीच्या पद्धतीने हाताळणी होऊ शकते. अशा औषधांमुळे विषारी परिणाम किंवा अनपेक्षित प्रतिक्रिया होऊ शकतात. रुग्णालयाने अशी औषधे उघडपणे टाकणे हे वैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन आहे.

मुदतबाह्य औषधे उघड्यावर जाळल्याचा प्रकार लक्षात येताच संबंधित कर्मचाऱ्यांना बोलावून माहिती घेण्यात आली. काही औषधे नजरचुकीने कचऱ्यासोबत जाळल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी तातडीची बैठक घेऊन अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी आवश्यक सूचना दिल्या आहेत.
डाॅ. सोनाली गायधनी, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, वणी
औषधे उघड्यावर जाळल्यामुळे निर्माण होणारा धूर आरोग्यास हानिकारक असून, असा प्रकार नियमबाह्य आणि चुकीचा आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना नियम माहिती नसल्यास, ती गंभीर दुर्लक्षाची बाब आहे. या घटनेची चौकशी करून योग्य ती कारवाई करणे आवश्यक आहे.
राहुल जाधव, ग्रामस्थ, वणी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT