नालासोपारा : विरार पश्चिम येथे एका इसमाने आपल्या पत्नी सह 5 वर्षीय चिमुकलीचा गळा आवळून खून करून स्वतः जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली. आर्थिक विवंचनेतून हे कृत्य केलं असावं असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
विरारच्या ग्लोबल सिटी येथे भाड्याने उदयकुमार काजवा (52), वीणा उदयकुमार काजवा (42), शिवालिका उदयकुमार (5) आणि वीणाचा पहिल्या पतीचा मुलगा वेदांत हा शाळेत गेला होता. मुलगा काल शाळेतून आल्यावर त्याने आई वडिलांना खूप कॉल केले पण त्यांनी एकही फोन कॉल उचलला नाही. त्यामुळे त्या मुलाला वाटले की आई वडील मला एकट्याला सोडून निघून गेले. मात्र सोसायटीमध्ये मुलाने सुरक्षा रक्षकांना सांगितल्यानंतर सुरक्षारक्षकाने दरवाजा ठोठावला मात्र आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. मग त्यांनी खात्री करण्यासाठी चावी बनवणार्या चालू वाल्याला बोलावून दरवाजा उघडला मात्र आतून साखळी लावली होती.
साखळी उघडल्यावर आत मध्ये उदयकुमार याने गळफास घेतल्याचे दिसले आणि वेळ खाली दोघांचे मृतदेह असल्याचे दिसले. त्यामुळे घाबरलेल्या सुरक्षारक्षकांनी तत्काळ पोलिसांना फोन करून माहिती दिली. पोलिसांनी आल्यानंतर सदर घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. आर्थिक विवंचनेतून ही आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
मंगळवारी (दि.25) वेदांत शाळेत गेला होता. त्यावेळी उदकुमार याने पत्नी आणि मुलीची हत्या करून आत्महत्या केली. वेदांत घरी आल्यावर घर बंद होते. त्यामुळे त्याने शेजाऱ्यांंकडे रात्र काढली. शेजाऱ्यांंनी रात्री पोलीस ठाण्यात काजवा कुटुंबिय बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. बुधवारी (दि.26) पोलिसांना तपास करत असता घरात तिघांचे मृतदेह आढळले.