क्राईम न्यूज Pudhari News Network
क्राईम डायरी

Thane | बनावट कुलमुखत्यारद्वारे केली जमीन विक्री

2.13 कोटीचा गंडा ; 5 जणांवर फसवणुकीचा गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : स्टेशनरी मॅन्युफेक्चरींग कंपनीसाठी जागा पाहणार्‍या फिर्यादी यांची ओळख झालेल्या अरविंद भरतभूषण अग्रवाल, अविनाश आणि अमित गुप्ता यांच्या मध्यस्थीने 2020 साली भिवंडी तालुक्यातील वडुनवघर येथील जमीन बनावट कुळमुखत्यारद्वारे नावावर करून 2 कोटी 13 लाख 1 हजार रुपयांचा चुना लावल्याचा प्रकार उघडकीस आला. या फसवणूक प्रकरणी फिर्यादी यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात पाच जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. अटक झालेल्या आरोपींपैकी एका आरोपीचा अटकपूर्व जमीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. या प्रकरणी वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याशी संपर्क झाला. मात्र प्रकरणाच्या तपास अधिकारी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

फिर्यादी (रा. आक्रोली सुर्यकिरण कॉ.सहकारी हौ. सोसायटी, बी विंग 201, आक्रोली रोड, लोखंडवाला टाऊनशिप, कांदिवली पूर्व, मुंबई) यांनी फसवणुकीच्या दाखल गुन्ह्यात अरविंद अग्रवाल, अविनाश अग्रवाल, पांडुरंग पाटील, दिनेश गौतम पाटील आणि दीपक कीर्ती शाह यांचा समावेश आहे. शांती नगर पोलिसांनी दोन्ही आरोपींना नोटीस बजावून गंभीर गुन्ह्यात सोडून दिले. यामुळे या प्रकरणात कुणाचा वरदहस्त आहे. याबाबत चर्चा रंगलेली आहे. या पाच जणांनी फिर्यादीला अग्रवाल वेअरहाउस सोल्युशन प्रा. लि. चे नावे मौजे बडुनवघर ता. भिवंडी जि. ठाणे येथील एका जमिनीची मिळकत असल्याचे सांगितले.

20 मे 2022 रोजी टोकन अग्रवाल वेअरहाउस सोल्युशन प्रा. लि कंपनीच्या खात्यावर दिले. सदर जमिनीच्या खरेदीसाठी फिर्यादीने अँग्रीमेंट फॉर सेलचे रजिस्टर नोटराईज 3 डॉक्युमेंट बीफोरमी वर नमुद तीन कंपनीच्या नावाने 5 जुलै 2022 रोजी बनविले. त्या व्यवहारापोटी 2 कोटी 13 लाख 1 हजार रुपये 20 मे, 2022 ते 27 सप्टेंबर,2022 या कालावधीत ऑनलाईन, चेक व कॅशव्दारे देण्यात आले. पैसे दिल्यानंतर अरविंद आणि अविनाश अग्रवाल यांनी रजिस्टर करून देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे अधिक चौकशी गंगुबाई आणि त्यांचा मुलगा दीपक यांच्याकडून माहिती मिळाली कि, मौजे वडुनवघर ता. भिवंडी जि. ठाणे येथील सव्हे नंबर, 20/94 ची जमीन ही बोगस कुळमुखत्यारचा वापर करून अवनिश अग्रवाल यांनी स्वत:चे कंपनी अग्रवाल वेअरहाउस सोल्युषन प्रा. लि. चे नावे करण्यात आल्याचे उघडकीस आले. जमिनीच्या व्यवहारात फसवणूक झाल्याचे समजताच आणि अविनाश आणि अरविंद अग्रवाल यांना नोंदणी करण्याचे सांगताच जे करायचे ते करा पैसे देणार नाही. त्यानंतर फिर्यादीने बनावट कागदपत्र सादर करून व्यवहारात फसवणूक केल्याचे समजले आणि शांतीनगर पोलीस ठाण्यात पाच जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलीस पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT