कांदिवली (ठाणे) : बांगुरनगर लिंक रोड पोलीस ठाणे येथे गौशिया वसीम शेख (वय 25) हिचा खून केल्याची तक्रार गौशिया हिच्या घरच्यांनी केली होती. बांगुरनगर लिंक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल ठाकरे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत डिटेक्शन टीम व एटीएस पथकाला जबाबदारी सोपवली. तांत्रिक बाबी, माहिती आणि मोबाईल लोकेशन वरून आरोपी पती वसीम रफिक शेख (वय 25) यास केवळ दोन तासांतच अटक केली. सध्या तो पोलीस कोठडीत असून पोलीस सखोल तपास करत आहेत.
गोरेगाव लिंक रोड, भगतसिंग नगर नंबर-2, ईलेक्ट्रीक टॉवरजवळ सदर पती-पत्नी राहतात. वासीम रफिक शेख याने 23 जून रोजी सकाळी 10 च्या सुमारास पत्नी गौशियाकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. गौशियाने पैसे दिले नाहीत या कारणावरून रागाने गौशियाचा गळा दाबून तिला ठार मारले.याबाबत महिती मिळताच नातेवाईकांनी बांगुरनगर लिंक रोड पोलीस ठाणे गाठले.
वासीमविरुद्ध गुन्हा नोंद केल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकरे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. आरोपी वासीमचा शोध घेण्यासाठी डिटेक्शन टिमचे अधिकारी सपोनि संजय सरोळकर, सपोनि रंधे व एटीएस पथकाचे पोलीस उपनिरिक्षक पियुप टारे यांच्या पथकास सूचना देवून आरोपीच्या मागावर रवाना केले. तसेच सायबर विभागाचे सपोनि विवेक तांबे यांनी तांत्रिक बाबी हाताळून माहिती गोळा केली.
वासीम हा रेल्वेने पलायन करणार असल्याचे सतत बदलणारे लोकेशनवरून दिसून आले.अखेर त्यास राम मंदिर रेल्वेस्टेशन परिसरातून अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले. पत्नीचा खून करून पळणार्या पतीला बांगूरनगर पोलिसांनी अवघ्या दोन तासांत अटक केली.