उल्हासनगर : अल्पवयीन मुलीचा गर्भपात करून अर्भकाचे शव स्मशानभूमीत पुरून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी आरोपीसह त्याच्या कुटुंबावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी आरोपीला गजाआड केले आहे.
उल्हासनगरमध्ये सागर ढमढेरे याने अल्पवयीन मुलीला सातव्या महिन्यात गर्भपाताच्या गोळ्या देत तिचा गर्भपात करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिची प्रकृती बिघडल्याने तिला मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गर्भवती ही अल्ववयीन असल्याची माहिती मध्यवर्ती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तपास केला असता गर्भपात करून अर्भकाचे शव हे स्मशानभूमीत पुरण्यात आल्याचे समोर आले. पोलिसांनी कार्यकारी दंडाधिकारी यांच्या उपस्थितीत शव बाहेर काढत डीएनए तपासणीसाठी पाठवून दिले. या प्रकरणी आरोपी ढमढेरेसह त्याची पत्नी, सासू, मेव्हणीवर गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.