ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक एकने गोवा निर्मित भारतीय बनावटीची विदेशी मद्यसाठा जप्त केला. (छाया : अनिशा शिंदे)
क्राईम डायरी

Thane Crime News | 63 लाखाचा अवैध मद्यसाठा जप्त; ठाणे उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

गोवा निर्मित विदेशी मद्य वाहतूक प्रकरणी मोठी कारवाई; 800 बॉक्स जप्त

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक एकने गोवा निर्मित भारतीय बनावटीची विदेशी मद्याची (IMFL) बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहनावर मोठी कारवाई करत 800 बॉक्सचा मद्यसाठा जप्त केला.

मुंब्रा येथील अमित गार्डनजवळ राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार, अधीक्षक प्रविण तांबे यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोठी कारवाई करण्यात आली. शुक्रवार (दि.16) रोजी सायंकाळी 5:15 वाजता भरारी पथकाने टाटा 1613 सहाचाकी टेम्पोची (MH-05-AM-1265) तपासणी केली असता या वाहनात गोव्यातून ठाण्यात आणलेले विदेशी मद्य आढळून आले.

अवैध वाहतूकीत 800 बॉक्स मद्य तसेच टेम्पो असा एकूण 63,98,400 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

याप्रकरणी 800 बॉक्स मद्य तसेच टेम्पो असा एकूण 63,98,400 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वाहनचालक जुल्फेकार ताजअली चौधरी याला अटक करण्यात आली आहे. निरीक्षक एम.पी. धनशेट्टी, दुय्यम निरीक्षक एन.आर. महाले, आर.के. लब्दे, सहाय्यक दु.नि. बी.जी. थोरात व इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही कारवाई पार पडली. अधीक्षक प्रविण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक महेश धनशेट्टी हे पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT