क्राईम डायरी

खळबळजनक! नाशिकमध्ये काँग्रेसच्या तालुका अध्यक्षांनी उचललं टोकाचं पाऊल

MLA Nitin Pawar : आमदाराच्या त्रासाला कंटाळून जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न

अंजली राऊत

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क | कळवणचे आमदार नितीन पवार व पत्नी जयश्री पवार यांच्या विरोधात काम केल्यामुळे ग्रामसेवक असणाऱ्या पतीला त्रास दिला जात असल्याचा आरोप करत ग्रामसेवक यांच्या पत्नी काँग्रेसच्या पदाधिकारी तालुका अध्यक्ष शीतल रामराव महाजन यांनी विषारी औषध घेऊन जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कळवणचे आमदार नितीन पवार व त्यांच्या पत्नी जयश्री पवार या सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने खोट्या तक्रारी दाखल करतात. त्यातून ते नेहमी त्रास देतात. शिवाय ग्रामसेवक असलेल्या पतीला ही त्रास देतात, असा आरोप शीतल रामराव महाजन यांनी केला आहे. शीतल या काँग्रेसच्या पदाधिकारी आहेत. या त्रासाला कंटाळून त्यांनी अखेर विषारी औषध घेवून जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न त्यांनी कळवणमध्ये केला आहे.

नेमकं काय घडलं ?

नाशिक जिल्ह्यातील कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार व त्यांच्या पत्नी जयश्री पवार ह्या कोणत्या ना कोणत्या कारणाने खोट्या तक्रारी करून ग्रामसेवक असलेल्या पतीस त्रास देतात. म्हणून काँग्रेसच्या पदाधिकारी असलेल्या शीतल महाजन या महिलेने विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना कळवण येथे घडली आहे.

आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी या महिलेने तशी चिठ्ठी देखील लिहून ठेवल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आमदार नितीन पवार व जयश्री पवार यांच्या विरोधात काम केल्यामुळे शीतल महाजन यांच्या ग्रामसेवक पतीला खोट्या तक्रारी करून अटकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, अनेकवेळा चौकशी होऊनही तक्रारीत तथ्य आढळलेले नाही. तरीही, जाणीवपूर्वक त्रास सुरूच होता, असे महाजन यांनी चिठ्ठीत म्हटले आहे. नुकतेच विधिमंडळाच्या अधिवेशनात आमदार नितीन पवार यांनी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित करत ग्रामसेवक रामराव महाजन यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. आमदार महोदयांकडून जाणीवपूर्वक होत असलेल्या याच त्रासाला कंटाळून शीतल महाजन यांनी विषारी औषध घेऊन स्वतःला संपविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शीतल महाजन यांचे बंधू योगेश गायकवाड यांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT