नाशिक : चामरलेणी येथे कर्नाटक येथील एका ट्रकचालकाची हत्या केल्याची घटना २१ जून रोजी उघडकीस आली होती. अखेर सीसीटीव्हीचा धागा पकडून या गुन्ह्याचा उलगडा करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट एकला यश आले आहे.
चामरलेणी येथे कर्नाटक येथील एका ट्रकचालकाची हत्याप्रकरणी चौघा संशयित टवाळखोरांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. केवळ लूटमारीच्या उद्देशाने हा खून केला असून, ट्रकचालकाने चुकीचा एटीएम पासवर्ड सांगितल्याने, त्याला जीव गमवावा लागल्याचे उघड झाले आहे.
विजय मधुकर खराटे (२०, रा. वडनगर, जैन मंदिराजवळ, म्हसरूळ), संतोष सुरेश गुंबाडे (२६, रा. गणेशचौक, कोळीवाडा, म्हसरूळ), अविनाश रामनाथ कापसे (२०, गणेश अपार्टमेंट, राऊ हॉटेलजवळ, म्हसरूळ लिंक रोड) व रवि सोमनाथ शेवरे (२८, रा. दत्तमंदिरच्या मागे, मानोरी, पो. पिंपळनारे, ता. दिंडोरी) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने पाेलिस काेठडी सुनावली आहे. खून केल्याच्या १४ दिवसांपासून चारही संशयित तो पचविण्याच्या आविर्भावात वावरत होते. युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या सूचनेने हवालदार प्रवीण वाघमारे, विशाल काठे, संदीप भांड, अंमलदार मुक्तार शेख, आप्पा पानवळ यांनी तपास सुरू केला. त्यांनी परिसरातील पाच किलाेमीटर परिघातील सीसीटीव्ही पडताळले. पण त्यात त्यांना काहीही सुगावा मिळाला नाही. अखेर नाराज हाेऊन ते पुढे जात असताना त्यांना एकतानगर येथील एका काेपऱ्यात सीसीटीव्ही कॅमेरा दिसला. त्यातील फुटेजची पडताळणी केली असता, त्यांना बारा मिनिटांच्या अंतराने एक दुचाकी जात असल्याचे व अंधूक स्वरूपात तिचा लाइ्ट चमकताना दिसला. हाच धागा पकडून तपास केला असता पाेलिसांनी परिसरासह विविध एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही पडताळले. त्यात संशयितांचे चेहरे स्पष्ट झाले. त्यानंतर पाेलिसांनी ही दुचाकी कुठून कुठे जात आहे, याचा माग काढला असता दुचाकी म्हसरूळ भागातील असल्याचे समाेर आले. त्यानुसार, चाैघांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे चाैकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
मानाेरी येथे राहणारा संशयित रवी शेवरे याने आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परिसरात असलेला कंटेनर व चालक उमेश नागप्पा आंबिगार (३४, रा. मरकुंडा गाव, ता. जि. बिदर, कर्नाटक) यांची रेकी करुन त्याला लुटण्याचा प्लॅन रचला. त्याने त्याच्याशी ओळख वाढविण्याचा प्रयत्न केला. पण आंबिगारने भिक घातली नाही. यानंतर, शेवरे याने मित्रांना या चालकाकडे भरपूर पैसे भेटतील, असे सांगून लुटण्याचा प्लॅन रचला. त्यानुसार त्याचे साथीदार संशयित अविनाश कापसे, संतोष गुंबाडे, विजय खराटे यांनी २१ जूनच्या मध्यरात्री सिगारेट पेटविण्याच्या बहाण्याने आंबिगारला उठविले व त्यास जबर मारहाण केली.
संशयितांनी आंबिगारचे दाेन एटीएम कार्ड ताब्यात घेत पासवर्ड विचारला. त्यानंतर गुंबाडे हा पैसे काढण्यासाठी दुचाकीवरुन एटीएममध्ये गेला. पासवर्ड चुकीचा असल्याने पैसे आले नाही. त्याचा राग आल्याने त्यांनी परत आंबिगारला मारहाण करत खराटेच्या दुचाकीवरून ए. टी. पवार शाळेजवळील अवतार पाईंट येथील तीन एटीएममध्ये नेले. तेथेही आंबिगारने चुकीचा पासवर्ड सांगितल्याने पैसे आले नाही. त्याचाच राग आल्याने संशयितांनी त्याला जखमी अवस्थेत दुचाकीवर बसवून चामरलेणीच्या पायथ्याशी नेत दांडक्याने, दगडाने मारहाण केली. तसेच येथील पावसाच्या पाण्याने साचलेल्या डबक्यात तोंड बुडवून तसेच गाळा दाबून खून केला. तिघे खून करत असतानाच, रवी शेवरे हा लक्ष ठेऊन