जळगाव : पुढारी ऑनलाईन डेस्क | मुक्ताईनगर येथील यात्रा महोत्सवात काही टवाळखोर तरुणांनी केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री खासदार रक्षा खडसे यांच्या मुलीसह अन्य मुलींची छेड काढली. छेडछाड प्रकरणी सुरक्षारक्षकाच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी डीवायएसपी कृष्णांत पिंगळे यांनी घटनास्थळी पोहोचले आहे
मुक्ताईनगर येथील यात्रा महोत्सवात काही टवाळखोर तरुणांनी रक्षा खडसे यांच्या मुलीसह अन्य मुलींची छेड काढली. रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत असलेल्या सुरक्षारक्षकाने टवाळखोर मुलांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र टवाळखोरांनी सुरक्षारक्षकासही धक्काबुक्की केली
भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची टवाळखोरांनी छेड काढल्याची घटना समोर आली आहे. जळगावमधील या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. राज्यात आणि देशात महिला सुरक्षेचा मुद्दा सातत्याने ऐरणीवर येत आहे. या घटनेने महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
छेडछाड प्रकरणी सुरक्षारक्षकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र मुलीची आणि तिच्या मैत्रिणींची छेडछाड करणाऱ्या तरुणांना अटक न झाल्याने रक्षा खडसे आक्रमक झाल्या आहेत. टवाळखोर तरुणांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी आज रविवार (दि.2) रक्षा खडसे यांनी पोलीस स्टेशनला भेट दिली. टवाळखोरांनी ज्या मुलींची छेड काढली त्या मुलींमध्ये काही अल्पवयीन मुलींचाही समावेश आहे. टवाळखोर व छेडखानी करूनही तरुण मोकाट असल्याने रक्षा खडसे यांनी पोलिसांना जाब विचारला..
अनिकेत भोई, पियुष मोरे, सोहम माळी, अतुल पाटील, किरण माळी यांनी रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याची माहिती मिळत आहे. मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये या टवाळखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माझी मुलीला इतर तीन चार मुलींना टवाळखोर मुलांनी छेडलं आहे. मी केंद्रीय मंत्री व खासदार म्हणून नाही आई म्हणून न्याय मागण्यासाठी पोलीस स्टेशनला आली आहे. माझीच मुलगी सुरक्षित नाही तर इतरांचं काय? राज्य सरकारला कठोरा कठोर कारवाई कायद्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात मागणी करणार. एका लोकप्रतिनिधीच्या मुलीची जर छेड काढला जात असेल इतर सामान्य मुलींचे काय होणार? मी मुख्यमंत्र्यांना भेटून अशा घटने संदर्भात अधिकाधिक कारवाईची मागणी करणार आहेरक्षा खडसे, केंद्रीय मंत्री