माणगाव (रायगड) : माणगाव जवळील कुंभे पुनर्वसन वसाहत भादाव येथील ७४ वर्षाच्या वृद्ध महिलेची तिच्याच राहत्या घरात अज्ञात चोरट्यांनी शिरून तिची हत्या करून सोन्याचे दागिने घेऊन चोरटा पसार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले असून रायगड पोलीस चक्रावून गेले आहेत.
भादाव माणगाव तालुक्यातील गावाजवळ असणाऱ्या कुंभे पुनर्वसन वसाहत भादाव येथे शांताबाई शंकर कांबळे राहत होत्या. दरम्यान मौजे कुंभे पुनर्वसन वसाहत भादाव येथे मयत शांताबाई शंकर कांबळे वय वर्ष ७४ यांच्या घरात कोणीतरी अज्ञात व्यक्तीने ती वृद्ध महिला एकट्याच असताना अज्ञात आरोपीने त्यांचे घरामध्ये प्रवेश करून कोणत्यातरी हत्याराने त्यांना ठार मारून त्यांचे अंगावरील ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे चैन १० ग्रॅम वजनाची तसेच ५० हजार रुपये किमतीचे हातातील सोन्याच्या १ जोड बांगड्या १० ग्राम वजनाच्या असा एकूण १ लाख किमतीची जबरी चोरी केली. या घटनेची फिर्याद रामचंद्र बावदाने रा. उतेखोल गाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली या प्रकरणी माणगाव पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध कॉ.गु.रजि. नं. १८२/२०२५ भा.न्या.स. कलम १०३ (१), ३११, ३३३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
या घटनेची माहिती मिळताच रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल माणगाव उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी, स्थानिक गुन्हा शाखेचे मिलिंद खोपडे यांनी घटनास्थळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांनी भेट देवून तपास सुरु केला आहे.