Pathri Crime Woman Throws Newborn Baby out of moving bus
पाथरी (छत्रपती संभाजीनगर) : पुणे येथून परभणीकडे जात असलेल्या एका खासगी ट्रॅव्हल बसमधून प्रवास करताना नवजात अर्भकाला थेट बसमधून रस्त्यावर फेकल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि.१५) सकाळी पाथरी-सेलू रस्त्यावर उघडकीस आली. सतर्क नागरिकामुळे हा प्रकार उजेडात आल्यानंतर पोलिसांनी बसचा पाठलाग करीत बाळ फेकणाऱ्या पती, पत्नी यांना ताब्यात घेतले.
संत प्रयाग ही ट्रॅव्हल बस पुणे येथून परभणीकडे जात होती. मंगळवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास ही बस देवनांद्रा शिवारातून जाताना नवजात बाळ रस्त्यावर फेकल्याचे एका नागरिकाच्या निदर्शनास आले. त्याने प्रसंगावधान राखत पाथरी पोलिसांना कळविले. पोलिस निरीक्षक महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक लोखंडे, थोरे, वाघ, कदम यांच्या पथकाने शोध मोहीम राबवित त्या बसचा सेलू ते परभणी दरम्यान पाठलाग केला. यातच पथकाने परभणीतील जुन्या जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर ती बस थांबवून दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव ऋतिका मिलिंद ढेरे (१९, रा. राहुलनगर, परभणी) तर पुरुषाचे नाव अल्ताफ मेहनुद्दीन ( टाकला प्लॉट, हनुमाननगर, परभणी ) असे आहे. संबंधित महिला व पुरुष हे एकमेकांचे पती-पत्नी असल्याचे सांगत आहेत.
परिषदेच्या कार्यालयासमोर ती बस थांबवून दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव ऋतिका मिलिंद ढेरे (१९, रा. राहुलनगर, परभणी) तर पुरुषाचे नाव अल्ताफ मेहनुद्दीन ( टाकला प्लॉट, हनुमाननगर, परभणी ) असे आहे. संबंधित महिला व पुरुष हे एकमेकांचे पती-पत्नी असल्याचे सांगत आहेत.
नवजात अर्भक काळ्या आणि निळ्या कपड्यात गुंडाळलेले होते. ऋतिका व अल्ताफ यांच्या अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म झाला, त्याची विल्हेवाट लावण्यासाठी हे कृत्य दोघांनी केल्याचा अंदाज आहे. प्रसूती बसमध्ये झाल्याचा दावा युवतीने केला असला तरी बसमध्ये चढण्यापूर्वी प्रसूती झाली असावी, असे पोलिसांना वाटते. त्या दृष्टीने पोलिस चौकशी करीत आहेत.