पोक्सो गुन्ह्यात अटक pudhari file photo
क्राईम डायरी

Nashik | सरपंचाने अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने घेतले चुंबन

सरपंचाला ’पोक्सो’ गुन्ह्यात अटक; दिंडोरी तालुक्यातील जोरण येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

दिंडोरी : तालुक्यातील जोरणच्या सरपंचावर अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने चुंबन घेतल्याप्रकरणी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. (sarpanch forcibly kissed girl)

दिंडोरी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित मुलीचे आई-वडील कामानिमित्त बाहेर गेले असता संशयित सरपंच मंगेश पोपट लोखंडे (28) हा घरात पाणी मागण्याच्या बहाण्याने आला होता. त्यानंतर अतिप्रसंग करीत जबरदस्तीने चुंबन घेतले. घाबरलेल्या पीडितेने घराबाहेर धाव घेत कुटुंबीयांशी संपर्क साधत घडल्या प्रकाराची माहिती दिली. तिच्या आई-वडिलांनी तत्काळ घर गाठत विचारपूस केली असता त्यात तथ्यांश आढळले. त्यानंतर दिंडोरी पोलिस ठाण्यात येऊन रीतसर फिर्याद नोंदवण्यात आली. प्राथमिक चौकशीअंती पोलिसांनी संशयित लोखंडेविरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT