नाशिक : शहरातील ध्रुवनगरजवळील शिवाजीनगर येथे २३ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळला. त्याचा इतर दोघांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा अंदाज गंगापूर पोलिसांनी वर्तवला आहे.
नासीम शाह (२३) असे मृत युवकाचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सोमवारी (दि. २६) सायंकाळी शिवाजीनगर परिसरातील तलावाजवळ नासीमचा मृतदेह आढळला. त्याच्यासमवेत असलेल्या दोघांनी त्यांच्यातील वादातून नासीमला मारहाण केली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. मारेकऱ्यांची ओळख पटवून त्यांचा शोध रात्रीपर्यंत सुरू होता. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.