गणेश सुमित पुजारी (वय ९, रा. मंगलमूर्तीनगर)  Pudhari News Network
क्राईम डायरी

Nashik Murder | पित्याकडून चिमुकल्याचा गळा आवळून खून

मृतदेह पोत्यात टाकून सासरच्या दारावर पोते ठेवून मारेकऱ्याने काढला पळ

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : जेलरोड परिसरातील मंगलमूर्तीनगर परिसरात बापानेच नऊवर्षीय मुलाचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मारेकऱ्याने मृतदेह पोत्यात टाकून सासरच्या दारावर पोते ठेवून पळ काढला. गणेश सुमित पुजारी (९, रा. मंगलमूर्तीनगर) असे मृत मुलाचे नाव आहे. मंगळवारी (दि. २९) दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला.

मंगलमूर्तीनगर परिसरातील सुमित भारत पुजारी याने मंगळवारी (दि. २९) दुपारी तीनच्या सुमारास गणेश याचा गळा दाबून खून केला. त्यानंतर सुमितने गणेशचा मृतदेह पोत्यात टाकून आम्रपालीनगर येथील सासरच्या घरासमोर ठेवून पळून गेला. नातलगाने पोते पाहिले असता त्यात गणेशचा मृतदेह पाहिल्यानंतर टाहो फोडला. पाेलिस तपासात सुमित पुजारी याचे पत्नीसोबत वारंवार वाद होत असल्याचे समोर आले. या वादाला कंटाळून पत्नी माहेरी राहण्यास आली होती. त्यामुळे रागाच्या भरात सुमितने गणेशचा गळा आवळून खून केला. संशयित पुजारी यास पोलिसांनी अटक केली असून, उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुजारी दाम्पत्यास मुलगा आणि मुलगी असून, गणेश हा लहान होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT