नाशिक : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तिघा जणांनी तक्रारदार व साक्षीदाराची एक कोटी १५ लाख ३३ हजार रुपयांची फसवणूक केेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांच्यासह इतर साक्षीदारांशी संशयित आरोपी रिया सेहगल, संजय कपूर व त्यांचे अनोळखी साथीदार यांनी २४ जून ते २२ ऑगस्ट या कालावधीत वेळोवेळी संपर्क साधला. त्यानंतर संशयित आरोपींनी फिर्यादी व साक्षीदारांना शेअअर मार्केेटमध्ये गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणात नफा कमावून देण्याचे आमिष दाखविलले. त्यावर विश्वास ठेवून फिर्यादी व साक्षीदार यांनी अनुक्रमे ६११ लाख २३ हजार ५२९, १४ लाख ४० हजार, २९ लाख ९० हजार व १६ लाख ८० हजार अशी एकुण एक कोटी १५ लाख ३३३ हजार ५२९ रुपयांची गुंतवणूक संशयितांनी सांगितलेल्या वेगवेेगळ्या बँक खातेदारांचच्या खात्यांवर ऑनलाइन पद्धतीने शेअर मार्केटमध्ये केली.
मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करूनही नफा होत नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर फिर्यादींनी संशयितांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर फिर्यादीी यांनी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दिली आहे.