Nashik Firing Update : नाशिक हादरले ! पुन्हा गोळीबाराची घटना Pudhari news network
क्राईम डायरी

Nashik Firing Update : नाशिक हादरले ! पुन्हा गोळीबाराची घटना

सराईत गुन्हेगाराच्या घरासमोरच हवेत गोळीबार; संशयित विकी गुंजाळ ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : शहरात पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली असून, त्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. सोमवारी (दि. ३) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास शरणपूर रोडवरील संत आंद्रिया चर्चजवळील बोधलेनगर परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने काही संशयितांकडून हवेत गोळीबार करण्यात आला. पूर्वीचे दोन सराईत गुन्हेगार जिवलग मित्र होते आता ते एकमेकांचे विरोधक असल्याचे समोर आले असून या वादातूनच हा गोळीबार झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

या घटनेत संशयित विकी गुंजाळ याने गोळीबार केल्याचे पोलिसांना समजताच पोलिस पथकाने तातडीने कारवाई करत केवळ 15 ते 20 मिनिटांत त्याचा पाठलाग करून जेहान सर्कल परिसरातून त्याला चॉपरसह ताब्यात घेतले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, हा गोळीबार सराईत गुन्हेगार हर्षल पाटणकर याच्या घरासमोर करण्यात आला. पाटणकर हा विविध गुन्ह्यांमध्ये पोलिस पथकात वॉन्टेट आरोपी असून, त्याचे एका गुन्हेगारी टोळीशी जुना वाद असल्याचे समोर आले आहे. गंगापूर गावातील टोळीच्या इशाऱ्यावरून हा हल्ला घडवून आणल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सोमवारी (दि. ३) रात्री साडेदहा वाजता चार संशयित दोन दुचाकींवर बोधलेनगरमध्ये आले. त्यापैकी एकाने कमरेला लावलेले पिस्तूल काढून हवेत गोळीबार केला, तसेच पाटणकर याच्या घराच्या दरवाजावर लाथाही मारल्या. काही क्षणातच हे संशयित दुचाकींवरून पसार झाले. पोलिसांनी नाकेबंदी करून विकी गुंजाळ यास पकडले आहे.

या घटनेमुळे पुन्हा एकदा नाशिकमधील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिस आयुक्तालयाकडून शहरातील गुन्हेगारीविरोधात कायद्याचा बालेकिल्ला अंतर्गत कठोर मोहीम राबविली जात असली तरी अशा घटना गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन अद्याप झालेले नाही, हे दिसून येत आहे.

सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. ताब्यात घेतलेल्या विकी गुंजाळची चौकशी क्राईम ब्रांच युनिट–1 येथे सुरू असून, या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

गोळीबारात गंगापूर कनेक्शन ....

क्राइम ब्रँच ने काही महिन्यापूर्वी गंगापूर येथील एका सराईत गुन्हेगाराला ताब्यात घेतले होते.त्याच्याकडून गावठी कट्टाही जप्त करण्यात आला होता त्याची चौकशी केली असता त्याने सांगितले की, "हर्षल पाटणकर आणि मी मित्र होतो मात्र आता आमच्या दुश्मनी आहे त्यामुळे कायम माझ्याजवळ पिस्तूल असते ज्या दिवशी मला तो दिसेल मी त्याला सोडणार नाही."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT