नाशिक : सातपूर येथील गोळीबार व अंबड खंडणी प्रकरणातील संशयित आरोपी तथा सराईत गुन्हेगार निखिल निकुंभ याला अंबड गुन्हे शाखेच्या पथकाने ठाणे येथून ताब्यात घेतले आहे. क्राईम ब्रँच युनिट क्रमांक १ च्या पथकाने ‘सच बोल’ या कार्यक्रमांतर्ग त्यास फराळ देण्यात आले. नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या विशेष मोहिमेअंतर्गत, गुन्हे शाखेच्या कार्यालयाबाहेर येताना निखिल निकुंभने ‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’ अशा घोषणा देखील दिल्या.
सातपूर गोळीबार प्रकरणात भूषण लोंढे, प्रकाश लोंढे आणि दीपक लोंढे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ‘पुष्कर बंगला’ बळकावण्याचा आणि खंडणी मागण्याचा आरोपही लोंढे कुटुंबीयांवर ठेवण्यात आला होता. या प्रकरणात सनी विठ्ठलकर व निखिल निकुंभ हे दोघेही संशयित आरोपी होते. मागील आठवड्यात सनी विठ्ठलकरला पोलिसांनी अटक केली होती. मात्र, निखिल निकुंभ हा घटना घडल्यानंतरपासून फरार होता. पोलिस अंमलदार भगवान जाधव आणि पोलिस नाईक भूषण सोनवणे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, निकुंभ ठाण्यातील मीरा भाईंदरमधील एसपीव्ही शाळा परिसरात लपल्याचे निष्पन्न झाले. त्या आधारे अंबड गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक केली.
याआधीचा गुन्हेगारी इतिहास
निकुंभ याच्यावर यापूर्वीही नाशिक शहर व ग्रामीण भागात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. अटक केल्यानंतर पुढील तपासासाठी त्याला सातपूर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. खंडणी प्रकरणात माजी नगरसेवक प्रकाश लोंढे, दीपक लोंढे आणि सनी विठ्ठलकर हे आधीपासूनच पोलिस कोठडीत आहेत.