नाशिक : सातपूर गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी शुभम चंद्रकांत निकम अंबड गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
सातपूर येथील नाइस संकुलजवळ ५ ऑक्टोबरला गोळीबाराची घटना घडली होती. तेव्हापासून तो फरार होता. अंबड गुन्हे शाखेच्या पथकातील भूषण सोनवणे, चारूदत्त निकम, भगवान जाधव यांना शुभम चंद्रकांत निकम याच्याबद्दल गोपनीय माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार अंबड गुन्हे शाखेने गौळाणे रोड, पाथर्डी गाव येथील कृष्णा प्राइड सोसायटीतून ताब्यात घेतले. शुभम निकम याच्यावर शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, दिलीप सगळे, हवालदार प्रकाश बोडके, योगेश चव्हाण, भूषण सोनवणे, चारूदत्त निकम, भगवान जाधव यांनी ही कारवाई केली.