नाशिक : शहर व ग्रामीण हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेला सराईत गुन्हेगार सातपूर परिसरात वावरत असताना त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
रविवारी (दि. २३) पोलिस अंमलदार तेजस मते, पोलिस हवालदार मनोज परदेशी, वाल्मीक चव्हाण, पोलिस अंमलदार प्रवीण वानखेडे, महेश खांडबहाले हे सातपूर गस्तीवर असताना, तडीपार अजय तुकाराम घुले (३०, रा. संतोषी माता झोपडपट्टी, सातपूर) हा सातपूर गावातील खोका मार्केट येथे उभा असल्याची माहिती मिळाली. यावेळी गुन्हे शाखा युनिट २ चे सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर अजय घुलेला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. त्याला सातपूर पोलिस ठाण्यात हजर करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अजय घुलेला शहर व ग्रामीण हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार केले असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.