नाशिकरोड: जेलरोड परिसरातील भीमनगरातील स्टेट बँकेचे एटीएम चोरट्यांनी मध्यरात्री अडीचच्या सुमारास फोडून 20 लाख 26 हजार 200 रुपयांची रोकड लंपास केली. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भीमनगरातील बँकेचे एटीएम शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास जेलरोड शाखेचे सीएमएस कंपनीच्या सर्व्हिस मॅनेजरकडून शाखा व्यवस्थापक मनोज कुमार यांना चोरी झाल्याची माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एटीएम मशीन फोडून आतमधील रोकड चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.शुक्रवारी (दि. १०) दिवसभरातील व्यवहारांनंतर एटीएममध्ये 20 लाख 26 हजार 200 रुपये शिल्लक होते आणि ती रक्कम चोरीला गेली आहे. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी एटीएम परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत तपास सुरू केला आहे. पीएसआय सीमा पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.