सिडको (नाशिक ): सिडको परिसरात सकल हिंदू समाज प्रणित धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशन, नाशिक यांच्या वतीने सिडकोत ‘हिंदू विराट सभेत कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईचे फलक झळकविण्या प्रकरणी अंबड पोलिसांनी लहान मुलांच्या हातात फलक दिल्या प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेऊन कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत . या प्रकरणी आयोजक सागर खराडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलिसांनी लहान मुलांच्या हातात फलक दिल्या प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांच्या मार्गर्शनाखाली सुरु आहे .