मनमाड (नाशिक) : पोलिसांनी अवैध धंद्याविरुद्ध धडक मोहीम सुरू केली असून, शहरातील तीन वेगवेगळ्या भागांत केलेल्या छापामारीत 10 किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी एका महिलेसह तिघांना अटक केल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक बाजीराव महाजन यांनी दिली.
शहरातील काही भागांत गांजा विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक विजय करे यांनी सपोनि हेमंत भंगाळे यांच्या पथकाने मुक्तांगण, टकार मोहल्ला, गवळीवाडा या तीन ठिकाणी सापळा रचून छापे टाकले. या कारवाईत दहा किलो गांजा जप्त करण्यात आला. तसेच तुकाराम देवबा गवळी (40, रा. गवळीवाडा), इरफाना रऊफ पठाण (35 रा. टकार मोहल्ला) आणि संदीप उर्फ धोंडू देवीदास व्यवहारे (50, रा. मुक्तांगण) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्यांमध्ये एका महिलेचा समावेश आहे.