सिडको : येथील पवन नगर भागात मंगळवारी (दि.8) रोजी दुपारच्या सुमारास मुख्य रस्त्यावर वर्दळ सुरू असतानाच एका दुचाकी वर आलेल्या तिघा भामट्यांनी चहा विक्रेत्यास धारदार शास्त्राचा धाक दाखवत चार हजार रुपये बळजबरीने लूटून पलायन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान घटना घडल्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी तात्काळ पाठलाग करून यातील एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार दि 9 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास पवन नगर भागात फिर्यादी रोहन वाकळे (18 ) यांचा चहा विक्रीचा व्यवसाय आहे दुपारी चार वाजता सुमारास पवन नगर येथे थांबले असता दुचाकी वर आलेल्या तिघा भामट्याने त्यांना धारदार शस्त्राचा धारदार धाक दाखवून त्यांच्या खिशातील चार हजार रुपयाची रोकड बळजबरीने काढून घेत तेथून त्यांनी पलायन केले. दरम्यान याबाबतची माहिती अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना तात्काळ घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस फौज फाटा रवाना केला यानंतर काही वेळातच दुचाकी वर पलायन करत असलेल्या तिघा संशितापैकी कुणाल मोरे (रा माऊली लॉन्स )याला ताब्यात घेतले फरार असलेल्या दोघा संशयतांचा पोलिसांकून शोध सुरू असुन लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी सांगितले .