जामिनावर सुटलेल्या गुन्हेगाराचा सत्कार; 9 जणांविरोधात गुन्हा दाखल Crime File Photo
क्राईम डायरी

नंदुरबार : जामिनावर सुटलेल्या गुन्हेगाराचा सत्कार; 9 जणांविरोधात गुन्हा दाखल

नंदुरबार शहरातील नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

नंदुरबार : जामिनावर सुटलेल्या गंभीर गुन्ह्याच्या आरोपीचा जल्लोषात सत्कार करून सोशल मीडियावर त्याचे व्हिडिओ प्रसारित करण्यात आले. या प्रकारामुळे धार्मिक भावना भडकवण्याचा तसेच लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा ठपका ठेवत नंदुरबार शहरातील नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कोणतीही गय केली जाणार नाही, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक एस. श्रवणदत्त यांनी दिला आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील एमपीडीए प्रकरण क्र. ०१/२०२५ अंतर्गत अटक झालेला बबलुकाल्या ऊर्फ शेख शहेबाज शेख शर फुद्दीन (वय ३१, रा. अलीसाहब मोहल्ला) याला औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने जामीन मंजूर केला. जामिनावर सुटल्यावर त्याने अनधिकृत जमाव गोळा केला आणि सत्काराच्या नावाखाली जल्लोष करण्यात आला.

या जल्लोषाचे फोटो आणि व्हिडिओ तयार करून इन्स्टाग्रामवर प्रसारित करण्यात आले. विशेषतः एका व्हिडिओत “किताबों पर धूल लगने से कहानी खत्म नहीं होती” आणि “तुमको क्या लगा खत्म हो गया किस्सा हमारा... वापस आ गया बाप तुम्हारा” असे आक्षेपार्ह व provocative वक्तव्ये करत धमकीवजा भाषा वापरण्यात आली होती.

या प्रकारामुळे दोन समाजांमध्ये धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, पोलीस नाईक खुशाल मुरलीधर माळी यांनी फिर्याद दिली. त्यानुसार खालील नऊ जणांविरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे:

नावी ऊर्फ उपाधी फकिरा कुरेशी (रा. सिव्हिल घरकुल), मुजाहिद आरीफ शेख (रा. आमिन भैयाची चाळ, अलीसाहब मोहल्ला), नवीद जलील कुरेशी (रा. बिफ मार्केट रोड, त्रिकोणी बिल्डिंग), आजिम सत्तार मन्सुरी (रा. एम. के. नगर, इमालवाडा), अर्शद सय्यद (रा. दोहशा तकिया), राऊत शेख (रा. अलीसाहब मोहल्ला), अरशद सर (रा. एम. आर. नगर, करण चौफुली), अनिक सय्यद (रा. दोहशा तकिया), बबलुकाल्या ऊर्फ शेख शहेबाज शेख शर फुद्दीन या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद गोसावी हे पोनि हेमंतकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT