Murder File Photo
क्राईम डायरी

Murder News Update | वैभववाडीत नाशिकच्या दोघांचा खून

कामगाराने त्याच्याच दोन साथीदारांवर धारदार शस्त्राने वार करून केला खून

पुढारी वृत्तसेवा

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथे नाधवडे येथील क्रशरवर वेल्डिंगचे काम करणाऱ्या कामगाराने त्याच्याच दोन साथीदारांवर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना बुधवारी (दि.३०) रात्री अकराच्या सुमारास घडली. धनेश्वर सत्यनारायण चौधरी (६६, रा. अंबड) आणि मनोज सिंग (३५) अशी खून झालेल्या दोघांची नावे आहेत. तर संजय बाबुराव लोखंडे (३८, रा. नाशिक) असे संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

नाधवडे कुंभजाई माळापरिसरात हरेश जनक यांच्या नवीन क्रशर जोडणीचे काम सुरू आहे. नाशिकची कंपनी हे काम करीत असून बुधवारी (दि.30 एप्रिल) दुपारपर्यंत काम करून काही कामगार वैभववाडी बाजारपेठेत गेले. तेथे मद्यसेवन करून रात्री परतले. तेथे पुन्हा मद्यसेवन करून जेवन केले. त्यावेळी संशयित आरोपी संजय लोखंडे व मृत धनेश्वर चौधरी या दोघांमध्ये चेष्टामस्करी सुरू होती. रात्री पावणेअकराच्या सुमारास समोरच्या कामगाराच्या खोलीतून ओरडल्याचा आवाज आल्याने कामगार तेथे गेले. त्यावेळी संजय लोखंडे हा धनेश्वर चौधरी यांच्या पोटावर बसून धारदार हत्याराने छातीवर वार करीत असल्याचे त्यांना दिसले. संजय लोखंडे यास इतर कामगारांनी बाजूच्या खोलीत कोंडले. कामगारांनी मनोज सिंगचा शोध घेतला असता तो देखील काही अंतरावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. याप्रकरणी पोलिस तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT