Money Laundering Scam Pudhari File Photo
क्राईम डायरी

Money Laundering Scam | मनी लॉण्डरिंगची भिती दाखवत दीड कोटींना गंडा

सायबर भामट्यांकडून दोघांची फसवणूक

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : मोबाइलवर संपर्क साधत मुंबई सायबर क्राइम विभागातून बोलत असल्याचे भासवून दोन जणांना दीड कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.

अज्ञात व्यक्तीने आपण मुंबई क्राइम ब्रँचमधून बोलत असल्याचे फिर्यादींना भासविले. तुमच्या मोबाइल नंबर व आधारकार्डवर अनधिकृत व्यवहार झाले आहेत, असे सांगून नरेश गोयल याच्या मनी लॉण्डरिंग प्रकरणात तुमचा सहभाग आहे. तुम्हाला तुमचे सर्व आर्थिक तपशील व स्थावर मालमत्ता यांची माहिती आम्हाला द्यावी लागेल, असे फोनवर व चॅटिंगद्वारे सांगितले. फिर्यादीने घाबरून सायबर भामट्याने सांगितल्याप्रमाणे त्याच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये एक कोटी १३ लाख ३० हजार रुपये भरले. त्याचप्रमाणे या सायबर भामट्याने आणखी एकाला फोन करून मनी लॉण्डरिंग प्रकरणात अटक करण्याची भीती दाखवून विविध बँक खात्यांमध्ये ३३ लाख रुपये भरण्यास सांगितले. हा सर्व प्रकार २८ जुलै ते ९ ऑगस्टदरम्यान घडला. हा सर्व प्रकार खोटा असल्याचे समजताच फिर्यादी यांनी सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात सायबर भामट्याविरुद्ध फिर्याद दिली. पुढील तपास सायबबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ढवळे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT