सापाड : कॅन्डल मार्चमध्ये कल्याण आतील हजारो महिला पुरुषांसह वयोवृद्धांनी देखील आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. Pudhari News network
क्राईम डायरी

Kalyan Vishal Gavali | आरोपीला फाशी द्या; कॅन्डल मार्चमध्ये जनतेचा आक्रोश

Kalyan Crime Update : पोलिसांच्या मध्यस्थीने केले पीडितेवर अंत्यसंस्कार; उपस्थितांच्या डोळ्यात अश्रुंच्या धारा

पुढारी वृत्तसेवा

सापाड : अपहरण करून अत्याचार आणि नंतर निर्घृण हत्या करणार्‍या आरोपी विशाल गवळी याला फाशीची शिक्षा द्यावी यासाठी संतप्त नागरिकांनी कल्याण पूर्वेत कॅण्डल मार्च काढून आक्रोश व्यक्त केला.

कॅन्डल मार्च मध्ये कल्याण पूर्व येथील हजारो नागरिक सहभागी झाले होते. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्ता तैनात केला होता. या संपूर्ण घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी कल्याणातील महिला, पुरुष, बुजुर्ग व्यक्तींनी या कॅण्डल मार्च मध्ये सहभागी होऊन आरोपीला जास्तीत जास्त कठोर कारवाईचे मागणी लावून धरली.

समाजातील विकृतीला ठेचून काढण्याची गरज

अपहरण करून आत्याचारानंतर चिमुकलीची हत्या करणार्‍या नराधमाला फाशी देण्याच्या मागणीसाठी कल्याण पूर्वेतील संतप्त नागरिकांकडून कॅण्डल मार्च काढण्यात आला. कॅन्डल मार्चच्या माध्यमातून आरोपीला फाशी देण्याची मागणी, नागरिकांकडून जोर धरू लागली होती. अशा नराधमाला जगण्याचा कोणताही अधिकार नाहीये. समाजात विकृती वाढली आहे ती ठेचून काढण्याची गरज आहे. अशा घोषणा देत कॅण्डल मार्चमध्ये नागरिकांनी आपला आक्रोश व्यक्त केला.

मुलीचे अंत्ययात्रा कल्याण पूर्वेतून कल्याण पश्चिम बैल बाजार स्मशानभूमी पर्यंत काढण्यात आली. शव घेऊन जाणारी शववाहिनी संतप्त नागरिकांकडून न्यायाच्या मागणीसाठी यावेळी अडवण्यात आली होती.

मुलीची अंत्ययात्रा कल्याण पूर्वेतून कल्याण पश्चिम बैल बाजार स्मशानभूमी पर्यंत काढण्यात आली. शव घेऊन जाणारी शववाहिनी संतप्त नागरिकांकडून अडवण्यात आली. आणि जो पर्यंत आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेहाला अग्नी देणार नसल्याची भूमिका अंत्यसंस्काराच्या वेळस संतप्त नागरिकांनी घेतली. मात्र संपूर्ण नागरिकांना पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी आश्वासित केले की फास्टट्रॅक मध्ये हा गुन्हा चालवण्यात येणार असून लवकरात लवकर आरोपीला कठोर शिक्षा केली जाईल. त्यानंतर मृत मुलीच्या नातेवाईकांनी अंत्य संस्कारासाठी स्मशान भूमीत घेऊन गेले.

चित्रा वाघ यांनी पीडित महिलेच्या कुटुंबीयांची भेट घेतली

आरोपीचा करेक्ट कार्यक्रम होणार : चित्रा वाघ

चित्रा वाघ यांनी पीडित महिलेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या संपूर्ण घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी नागरिकांनी आक्रोश व्यक्त करत आरोपिला फाशीची शिक्षा देऊन सहजासहजी मरण नको, अशी मागणी करत त्याला आमच्या हातात द्या त्याचा करेक्ट कार्यक्रम आम्ही करू. या संपूर्ण प्रकारानंतर संतप्त नागरिकांशी बोलताना चित्रा वाघ यांनी सांगितले की गुन्हेगार कितीही मोठा असू दे त्या सर्वांचा बाप हा मुख्यमंत्री म्हणून बसलेला आहे. प्रत्येक गुन्हेगाराला बाहेर ठेचून त्याचा करेक्ट कार्यक्रम करण्यात येईल. आता कोणीही घाबरण्याची गरज नाहीये. या नराधमाला फाशी होणारच! मात्र अजून किती विकृत आरोपी मोकाट फिरत आहेत त्यांचादेखील करेक्ट कार्यक्रम होणार आहे. लैंगिक अत्याचारानंतर करण्यात आलेली हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल गवळी हा विनयभंगाच्या प्रकरणात जेलमध्ये होता. मात्र मनोरुग्ण असल्याचा खोटा दाखला डॉक्टरांकडून मिळवत आरोपी बेलवर बाहेर येऊन मोकाट फिरत होता. त्यामुळे अजून किती आरोपींना डॉक्टरांकडून मनोरुग्ण असल्याचा दाखला देण्यात आला आहे याचा तपास आता पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT