Dragging him out of the cafe, the gang took Suleiman's life
जळगाव : जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथे सुलेमान रहीम खान पठाण (वय 20) या युवकावर झालेल्या मारहाणीप्रकरणी जामनेर पोलिसांनी पाच जणांची नावे समोर आली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी दहा ते बारा संशयित आरोपींवरही कारवाई करण्यात आली आहे. दोन आरोपींना अटक झाली असून उर्वरितांचा शोध सुरू आहे.
घटनास्थळावरील माहितीनुसार, सुलेमान पठाण हा सोमवार (दि.11) रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास जामनेर येथे पोलिस भरतीचा फॉर्म भरण्यास गेला होता. त्यावेळी आरोपी अभिषेक राजपूत, रणजीत रामकृष्ण माताडे (दोघे रा. बेटावद खुर्द), आदित्य देवरे (रा. जामनेर), सोज्वळ तेली, कृष्णा तेली (दोघे रा. वाकी, जामनेर) तसेच दहा ते बारा संशयित आरोपींनी सुलेमान पठाण याच्यासह रहीम खान बनेखा पठाण, तबसून रहीम खान पठाण आणि मुस्कानबी शेख (सर्व रा. बेटावद खुर्द) यांना लाठ्या, काठ्या तसेच लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून धमकावले.
या प्रकरणी रहीम खान बनेखा पठाण यांच्या फिर्यादीवरून गु. र. नं. 0288/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1), 103(2), 140, 189(2), 191(2), 191(3), 190, 118(1), 115(2), 352, 351(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दोन आरोपींना सोमवार (दि.11) रोजी रात्रीच अटक केली असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पथकांकडून उर्वरित आरोपींचा विविध ठिकाणी शोध सुरू आहे. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित व अन्य अधिकारी रात्री उशिरा जामनेर पोलीस ठाण्यात उपस्थित होते.