जळगाव : शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये सुरत येथील ३५ वर्षीय तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरत येथे नोकरी करणारी पीडित तरुणी आपल्या उपजीविकेसाठी तिथे वास्तव्य करत आहे. तिने दिलेल्या तक्रारीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील रहिवासी विनोद शिवराम कुसळकर (वय ३५) याने १८ मे रोजी दुपारी साडेचार ते साडेपाच वाजेदरम्यान तिला जळगाव रेल्वे स्टेशनजवळील एका हॉटेलमध्ये नेले. तेथे त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यासंदर्भात पीडितेने रविवार, दि. १ जून रोजी रात्री तक्रार दाखल केली असून, त्यानुसार विनोद कुसळकर याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नसून, पोलीस पुढील तपास करत आहेत.