इंडसइंड बँक लिमिटेड भारत फायनान्स कंपनीचे कर्मचारी विक्की विठोबा पाटील (वय २४, रा. पथराड) हे ४ जुलै रोजी ग्रामीण भागातून कर्जाचे हप्ते वसूल करून मोटारसायकलने चाळीसगाव कार्यालयात परतत असताना त्यांच्यावर जबरी चोरी झाली Pudhari News Network
क्राईम डायरी

Jalgaon Crime: अमळनेरमध्ये अमली पदार्थ जप्त ते चोरट्यांना अटक, वाचा जळगावच्या क्राईम बातम्या वाचा एका क्लिकवर

भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : इंडसइंड बँक लिमिटेड भारत फायनान्स कंपनीचे कर्मचारी विक्की विठोबा पाटील (वय २४, रा. पथराड) हे ४ जुलै रोजी ग्रामीण भागातून कर्जाचे हप्ते वसूल करून मोटारसायकलने चाळीसगाव कार्यालयात परतत असताना त्यांच्यावर जबरी चोरी झाली होती. दोन अज्ञात इसमांनी गोंडगाव रोडवर त्यांना अडवून ६५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हिसकावून पलायन केले. या घटनेप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत बांबरुड परिसरातून माहिती मिळवली. आरोपींचा तपास करत असताना पथराड येथील गोपाल संजय पारधी (वय ३२) याला अटक केली. त्याच्या कबुलीनंतर गुन्ह्यात सहभागी इतर आरोपींची माहिती समोर आली. यानुसार मयूर ज्ञानेश्वर साळुंखे, अतुल नाना पाटील, कैलास वाल्मिक पाटील (सर्व रा. पथराड, ता. भडगाव) यांनाही अटक करण्यात आली.

पोलीसांनी आरोपींकडून ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात २ हजार रुपये किमतीचे अर्धवट जळालेले बायोमॅट्रिक मशीन, ५ हजारांचा सॅमसंग टॅब, १० हजारांची बजाज प्लेटिना (क्र. MH 54 A 8551), १० हजारांची स्प्लेंडर (क्र. MH 54 A 7375) व १० हजार रुपये रोख अशी एकूण जप्ती करण्यात आली.

पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (चाळीसगाव), उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. पांडुरंग पवार, सुशील सोनवणे, किशोर सोनवणे, निलेश ब्राह्मणकर, प्रवीण परदेशी, सुनील राजपूत, संदीप सोनवणे यांनी ही कारवाई पार पाडली. पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे हे या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.

अमळनेरमध्ये गांजा जप्त

अमळनेर तालुक्यातील जळोद या गावातून गांजा घेऊन अमळनेरला विक्री करण्यासाठी येणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून तीन लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे याप्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

याबाबत पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार अंमळनेर पोलीस स्टेशन येथील पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील यांना गुप्त माहिती मिळाली की दोन जण मोटरसायकलवर गांजा घेऊन अमळनेर शहरात येणार आहे. याबाबतची सूचना पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना दिल्यानंतर सदर छापा टाकण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगी घेऊन अमळनेर तालुक्यातील जळोद गावात एका शेतात जवळ थांबले. मोटर सायकल क्रं. एम. एच. १९-सी. टी. ४८४५ रात्री 10.10वाजेच्या सुमारास जळोद गावाकडुन एक काळ्या रंगाची बजाज प्लॅटीना मोटर सायकलवर दोन इसम हे डबलशीट आले .पोलिस कर्मचारी अमोल पाटील व जितेंद्र निकुंभ यांनी थांबविले असता त्याच्या ताब्यातील एक पांढ-या रंगाची गोणीसह दोघाना ताब्यात घेतले.पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम तहसिलदार रुपेशकुमार सुराणा अमळनेर सोबतच्या पोलीस स्टाफ व पंच पंचांसमक्ष ताब्यात घेण्यात आले. मोटर सायकल चालक महेश कैलास पाटील वय ३१ वर्ष धंदा मजुरी रा. मेन रोड, जडे गल्ली, भडगाव ता. भडगाव व त्याचे सोबत नितीन शरद गौड (मसराम) वय १९ वर्षे धंदा मजुर रा. गौंडबस्ती देशमुखनगर, पाचोरा असे सांगितले. दोघाना ताब्यात घेऊन गांजा व मोटर सायकल जप्त करण्यात आला.

३ लाख रुपये किमतीचा एका पांढऱ्या रंगाच्या गोणीमध्ये १५ किलो ४० ग्रॅम वजनाचा गांजा , ४० हजार रुपये किमती ची बजाज पलेटीना असा ३लाख ४० हजार रुपयाचा एकूण (१५ किलो प्रेम गांजा सैम्पलसह) मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अमळनेर पोलीस स्टेशन येथे गु. र. नं. २८६/२०२५ गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ८, २०, २२, ३(५) अन्वये पोकों ५३७ अमोल पाटील यांचे फिर्यादीवरुन गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर ची कारवाई ही पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक, चाळीसगाव परीमंडळ कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, अमळनेर विनायक कोते यांचे मार्गदर्शनाखाली . पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, सपोनि रविंद्र पिंगळे, सपोनि सुनिल लोखंडे, पोहेकों संतोच नांगरे, पोकों प्रशांत पाटील, पोका गणेश पाटील, पोकों अमोल पाटील, पोकों जितेंद्र निकुंभे, पोकों उज्वलकुमार म्हस्के, पोको हर्षल पाटील, पोकों योगेश बागुल, पोकों समाधान सोनवणे, पोकों सुनिल पाटील व होमगार्ड पुनम हटकर यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि सुनिल लोखंडे हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT