जळगाव : गाडीत प्रवास करणाऱ्या २२ वर्षीय युवतीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न तिकीट परीक्षकाने (टीटीई) केला. गोरखपूर- बंगळुरू विशेष रेल्वेत भुसावळ- मनमाड दरम्यान ही घटना घडली होती. मनमाड येथे दाखल झालेला गुन्हा शून्य क्रमांकाने भुसावळ रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
महिला प्रवाशाचा पाठलाग करून तिकीट परीक्षकाने (टीटीई) भुसावळ रेल्वे स्थानकाजवळ तरुणीसोबत गैरवर्तन केल्याच्या प्रकरणी टीटीई विरोधात मनमाड लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर फिर्यादी तरुणीलेने वडिलांना फोनवर संपूर्ण घटना सांगितली. त्यानंतर रेल्वे स्थानक भुसावळ येण्याच्या काही वेळ आधीपर्यंत टीटी तिवारी यांनी तिचा पाठलाग करत सातत्याने गैरवर्तन केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेनंतर रेल्वे प्रशासन आणि लोहमार्ग पोलिसांनी सतर्कतेने पुढील कारवाई सुरू केली आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत अशा घटना अत्यंत गंभीर असून, आरोपीवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीसांनी सांगितले आहे.
भुसावळ रेल्वे स्थानकावरुन दररोज 110 गाड्या तर आठवड्यातून 220 गाड्यांची ये-जा सुरु असते. रेल्वे सुरक्षा बल (RPF) कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मोठी अडचण निर्माण होत आहे.
महिला सुरक्षा उपाययोजना गरजेच्या असून भुसावळच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) इति पांडे स्वतः महिला असून, त्यांनी महिलांच्या सुरक्षेवर अधिक लक्ष केंद्रित करणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे. रेल्वे सुरक्षा बल (RPF) कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून त्वरित उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण होत आहे. दरम्यान, मनमाड येथे दाखल झालेला गुन्हा शून्य क्रमांकाने भुसावळ रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. प्रवाशांनी अशा घटनांबाबत तत्काळ रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधावा आणि सुरक्षिततेसाठी उपलब्ध हेल्पलाइनचा वापर करावा, असे आवाहन लोहमार्ग पोलीसांकडून करण्यात आले आहे.