Crime News Pudhari News Network
क्राईम डायरी

जळगाव : तेलंगणातील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जळगावात जेरबंद

जळगाव | आरोपी चंदानगर पोलीस स्टेशन, सायबराबाद (तेलंगणा) यांच्या ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : तेलंगणा राज्यातील सायबराबाद पोलीस आयुक्तालयाच्या चंदानगर पोलीस ठाणे हद्दीतील खून प्रकरणातील फरार आरोपीला जळगावमध्ये अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या सहकार्याने आरोपीला ताब्यात घेऊन तेलंगणातील पोलीस पथकाने त्याच्या विरोधात पुढील कारवाई सुरू केली आहे.

घटनेची सविस्तर माहिती अशी आहे की, सुमारे तीन महिन्यांपूर्वी चंदानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून झाला होता. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी अझहर निजाम खाटीक (रा. जळगाव) हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. दरम्यान, आरोपीच्या शोधासाठी चंदानगर पोलीस ठाण्याचे पथक जळगाव जिल्ह्यात दाखल झाले. त्यांनी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेऊन संपूर्ण माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बबन आव्हाड यांना तातडीने कारवाईचे आदेश दिले.

स्थानीय गुन्हे शाखेतील विजयसिंग पाटील आणि अक्रम शेख यांच्या पथकाने मेहरूण परिसरात सापळा रचून रविवार (दि.18) रोजी रात्री सुमारे 11.30 वाजता अझहर निजाम खाटीक याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी चंदानगर पोलीस स्टेशन, सायबराबाद (तेलंगणा) यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT