जळगाव : महावितरण कंपनीमध्ये कामाला असलेल्या व दोन महिन्यापूर्वीच स्वत:च्या नवीन घरात राहण्यासाठी गेलेल्या 32 वर्षीय वायरमनने शुक्रवार (दि.28) रोजी राहत्या घरात जीवनयात्रा संपवल्याची दुर्देवी घटना सकाळी 7 सुमारास उघडकीस आली. यासंदर्भात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
महावितरण कंपनीमध्ये वायरमन या पदावर काम करणारा समाधान रमेश शिरसाठ (वय-३२, रा. डांगरी ता.अमळनेर ह.मु. बिबा नगर, जळगाव) येथे राहत होता. समाधान शिरसाठ हा तरूण जळगावातील बिबा नगरात पत्नी व दोन मुलांसह वास्तव्याला होता. महावितरण कंपनीत वायरमन म्हणून नोकरीला होता. समाधान शिरसाट याने घरात सर्वजण झोपलेले असताना राहत्या घरात गळफास घेतली. ही घटना शुक्रवारी 28 फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता त्यांच्या पत्नीच्या लक्षात आल्याने उघडकीस आली आहे.
दरम्यान, शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या मदतीने खाली उतरून त्यांना जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी समाधान शिरसाठ यांना मयत घोषित केले. जीवनयात्रा संपविल्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. यासंदर्भात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, चार विवाहित बहिणी, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.