चारचाकी वाहन चालकाने भरधाव वेगाने कार चालवून एक रिक्षा आणि एक मोटर सायकल यांना उडवत व्हिनस चौकाला येऊन ठोकर दिल्याची घटना घडली आहे. Pudhari News network
क्राईम डायरी

Hit and Run | उल्हासनगरमध्ये भल्या पहाटे हिट अँड रन

भरधाव कारने रिक्षा, मोटरसायकलला उडविले; तीनजण जखमी

पुढारी वृत्तसेवा

उल्हासनगर : दारूच्या नशेत धुंद असलेल्या वाहन चालकाने भरधाव वेगाने कार चालवून एक रिक्षा आणि एक मोटर सायकल यांना उडवत व्हिनस चौकाला येऊन ठोकर दिल्याची घटना घडली आहे. या घटनेत कारमधील दोन्ही तरुणांची प्रकृती चिंताजनक आहे.

प्राप्त माहितीनुसार सकाळी पाच वाजता श्रीराम चौकाकडून व्हीनस चौकाच्या दिशेने एम एच 04 एच एफ 7030 ही कार भरधाव वेगाने येत होती. त्यावेळी प्रसूती रुग्णालयाच्या समोर भाजी आणण्यासाठी जाणार्‍या रिक्षा क्रमांक एम एच झिरो फाय सीजी 9918 ला जोरदार ठोकर दिली. ही ठोकर एवढी भीषण होती की रिक्षाने जागीच पलटी मारली. ह्या दुर्घटनेतील जखमींना रुग्णालयात दाखल न करता कार चालकाने भरधाव वेगाने पुढे जंगल हॉटेल जवळील महादेव मंदिरासमोर एक्टिवावर जाणारे दिपक पाटकर यांना उडवले. तब्बल 80 पेक्षा जास्त वेगाने असलेल्या या कारचे नियंत्रण सुटल्याने विनस चौकात चौथर्याला जाऊन जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारच्या बोनेटचा चेंदामेंदा झाला.

कार चालकाविरोधात गुन्हा दाखल

दुर्घटनेनंतर तात्काळ परिसरातील जागृत नागरिक आणि पोलिसांनी मिळून कारचालक आणि त्याचा मित्र या दोघांना मेहनतीने बाहेर काढून मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मोटर सायकल चालक दिपक पाटकर आणि रिक्षा चालक दशरथ मोरे यांना उपचारासाठी क्रिटिकेअर रुग्णालयात तर भाजी विक्रेता गुप्ता याला उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारचालक आणि त्याच्या सहकारी हे दोघेही दारूच्या नशेत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत पंचनामा करून कार चालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT